महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यात त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार.संदीप लगड...........!


प्रतिनिधी  :- दौंड 
महाराष्ट्र राज्यातील त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्यातील शहिद वीर पत्नी,शहिद माता-पिता,माजी सैनिक व सैनिक संघटना यांनी सर्वांनी मिळून महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३६ जिल्हाध्यक्ष यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना ०३/०४/२०२३ रोजी ११:०० वाजता निवेदन देण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाच्या अनेक तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी प्रस्ताव मांडला होता तो प्रस्ताव त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.शहाजी पवार,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा.आबासाहेब गरूड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.विक्रमजी जगताप,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आदरणीय मा.काशिनाथ पंडित,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुश खोटे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे सरचिटणीस मा.राजेंद्र कापरे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.महादेव खेडकर,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.सुनिल पवार,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे उपाध्यक्ष मा.बाळासाहेब पाटील,मा.बजरंग पाटील यांनी एक मताने ठराव मंजूर करून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून हिंदुस्थानातील तमाम माजी सैनिक हे दिल्ली (जंतर-मंतर)येथे OROP मध्ये असणाऱ्या विसंगती दूर करण्यासाठी व समान MSP, समान Pay and allowances,समान विकलांगता पेन्शन इ. जायज मागण्या घेऊन जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी अतिशय शांतिपूर्ण व सविधानिक पद्धतीने साखळी आंदोलन करत आहेत,तर सर्वप्रथम या आंदोलनाचे प्रणेते व नेते जे कोणी माजी सैनिक असेल तर त्यांचे मनस्वी अभिनंदन ,कारण माजी सैनिक (ORS AND JCOS ONLY) यांच्यावर गेल्या ७५ वर्षात भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांनी तर अन्याय केलाच परंतु त्याचबरोबर ७५ वर्षात जी काही सरकार या देशात आली त्यांनी देखील जवान व जेसीओ यांच्यावर अधिकारी वर्गाचे ऐकून पेन्शन व तमाम भत्ते यांच्याबाबत अन्याय केला आहे.
मागील OROP आंदोलनात आपण सर्वांनी अधिकारी वर्गाचे नेतृत्व मान्य करुन आंदोलन केले व OROP चा प्रश्न मोदी सरकारने मार्गी लावला ,परंतु चालाक अधिकारी वर्ग जो की संख्येने फक्त ३% आहे त्यांनी बजेटमधील ५७% वाटा हिसकावून घेतला व जवान जेसीओ जे की संख्येने ९७% टक्के आहेत त्यांना ४७% दिले ,त्यात जवान व जेसीओज यांना त्यांचा योग्य तो फायदा मिळाला नाही उलट बरेचशे सिनीयर NCOS व JCO साहेब यांचे पेन्शन त्यामुळे कमी होण्याचा धोकाही निर्माण झालेला आहे (कोश्यारी समितीने दिलेल्या अहवालानुसार OROP कमी वयात रिटायर्ड होणार्या जवान व जेसीओज यांना देण्यात यावा अशी शिफारस आहे,अधिकारी हा वयाच्या ५५ वर्षांनंतरच रिटायर्ड होतो,त्यामुळे अधिकारी वर्गाला OROP लागू नाही) हा जो सर्व अन्याय जवान जेसीओज व शहिद वीरनारी,विधवा पेन्शनर यांच्यासोबत जाणूनबुजून अधिकारी वर्गाने केलेली आहे याला वाचा फोडण्याचे काम कुठेतरी आपले माजी सैनिक करत आहे याला मिडीया कवर तर करत नाहीच परंतु उलट आंदोलनात फूट पाडण्याचे काम सरकार व काही अधिकारी वर्ग हा करत आहे ,तर आपण सर्व सैनिकांची कोणत्याही राजकीय पक्षाचा व संघटनेचा असो ही सर्वस्वी सामूहिक जबाबदारी आहे की आपण या आंदोलनाला आपली पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी करावे व आपल्या जायज मागण्या सरकारकडून मंजूर करुन घ्याव्यात.क्योंकी अभी नहीं तो कभी भी नहीं |
प्रत्येक माजी सैनिक संघटना व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी येत्या ३ एप्रिल २०२३ रोजी आपल्या जिल्हाधिकारी यांना आपल्या संपूर्ण जायज मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकारी यांना तसेच एक निवेदन खासदा यांना द्यावे .
आणि आपल्या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी व प्रसिद्धी देण्यासाठी मेसेज जास्तीत जास्त सैनिक संघटनेच्या ग्रुपवर फाॅरवर्ड करावा.यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना गावातील,तालुक्यातील,जिल्ह्यातील सैनिक व सैनिक परिवारा पर्यंत मॅसेज पोहचवायचे काम करत आहे.तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व सैनिक संघटना व महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने एकत्र येवून लढा उभा करून आपल्या न्याय व हक्कासाठी एकत्र येण्याचे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या