दत्ताआप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुस्ती स्पर्धा

दत्ताआप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुस्ती स्पर्धा
अकलुज, दि25(प्रतिनिधी)

हिंदूदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित व बागेचीवाडी (ता. माळशिरस) येथे लोकनेते स्वर्गीय दत्तात्रय (आप्पा) रघुनाथ वाघमारे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त (दि. २६) मार्च २०२३ रोजी रुपारी २ वाजता, बागेचीवाडी, येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले असलेचे जिल्हा उप प्रमुख पै नामदेवराव वाघमारे यांनी सांगितले. या कुस्त्यांचे उदघाटक प्रमुख उपस्थिती शिवसेना नेते माजी मंत्री भास्कर जाधव,अमोल किर्तीकर, आर जीरुपनवर, जि.प चे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, अनिल कोकीळ, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, डाँ धवलसिंह मोहिते पाटील, रंजन गिरमे,आप्पासाहेब जगदाळे, डाँ यशवंत कुलकर्णी, साईनाथ अभंगराव, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, अमर पाटील, पांडूरंग देशमुख, बाळासाहेब लवटे राहणार आहेत. लोकनेते स्व. दत्तात्रय (आप्पा) रघुनाथ वाघमारे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी निकाली कुस्त्यांच्या भव्य जंगी मैदानाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या