भटक्या विमुक्त जाती जमातींना गृहचौकशी करून जातीचे दाखले द्या
भटक्या विमुक्त जाती जमातींना जातीचा दाखला मिळण्यासाठी 1961 पूर्वीचा पुरावा सादर करावा लागतो. परंतु भटक्या विमुक्त जाती जमातींना पूर्वी आपली उपजीविका भागवण्यासाठी गावोगावी वस्ती करून राहत होते. त्यामुळे अनेक कुटुंब बेघर अशिक्षित आहेत. यानुसार त्यांना जातीचे दाखले काढताना 1961 पूर्वीचा पुरावा सादर करण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी व होतकरूंना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शैक्षणिक शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळेच कौशल्य व गुणवत्ता असून देखील उच्च शिक्षण घेता येत नाही. आणि एखाद्याने उच्च शिक्षण घेतलेच तरी जातीच्या दाखल्यावाचून शासकीय नोकरी व शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे भटके विमुक्त समाजात बेरोजगार व सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे भटके विमुक्त समाजाचे नुकसान तर आहेच परंतु देशाचे सुद्धा नुकसान आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असून भटके विमुक्तांच्या बाबतीत भेदभाव करू नये.असे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ माळशिरस तालुका कार्याध्यक्ष महेश शिंदे तथा मैत्री प्रतिष्ठान सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना देण्यात आले. आणि 15 ऑगस्ट रोजी लोकशाही पद्धतीने प्रांत कार्यालय अकलूज समोर आजादी दो आंदोलन करणार असा महेश शिंदे इशारा देण्यात आला.यावेळी मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या