दौंड महाराष्ट्र राज्यात २४ व्या कारगिल विजय दिवसानिमित्ताने प्रत्येक तालुक्यातील सैनिक व सैनिक परिवाराने एकत्र येवून तिरंगा रॅली काढून शहिद वीर पत्नी,शहिद वीर माता- पिता व शहिद कुटूबियांचा मान-सन्मान केला पाहिजे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराने २४ व्या कारगिल विजय दिवसानिमित्ताने एकत्र येवून कार्यक्रम साजरा केला पाहिजे,या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील,राजकीय क्षेत्रातील,सामान्य गोरगरीब जनतेला एकत्र घेवून कार्यक्रम साजरा केला पाहिजे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील सर्व सैनिक संघटना व तालुक्यातील सैनिक व सैनिक परिवाराने एकत्र आलेच पाहिजे.हे काय राजकीय व्यासपीठ नाही.महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून २४ व्या कारगिल विजय निमित्ताने प्रत्येक तालुक्यातील शहिद वीर पत्नी,शहिद वीर माता-पिता व शहिद कुटूबियांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना सर्वात पुढे असणार आहे.महाराष्ट्र राज्यात शहिद परिवारावर किती अन्याय व अत्याचार होतो.या बाबत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी,भुमीअभिलेख अधिकारी, सीओ,तालुक्यातील अधिकारी,सर्व कर्मचारी तसेच तालुक्यातील आमदार,माजी आमदार,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, सोसायटीचे संचालक यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देवून त्या ठिकाणी शहिद परिवाराला किती अडचणीचा सामना करावा लागतो हे तालुक्यातील शासन व प्रशासनाला १०० % कळाले तर महाराष्ट्र राज्यातील शहिद परिवाराच्या ज्या अडीअडचणी आहेत.त्या सुटल्याशिवाय राहणार नाही.२४ व्या कारगिल विजय या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यातील सैनिक व सैनिक परिवार एकत्र येवू शकतो व महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी असल्यास कागदपत्रे बरोबर घेवून येणे.ज्या शहरामध्ये कार्यक्रम असेल त्या शहराच्या गल्ली-गल्लीत जावून प्रत्येक दुकानदाराला कार्यक्रमाचे आमंत्रण द्या.एक तासासाठी दुकाने बंद ठेवलीच पाहिजे आपल्या शहरामध्ये सहभागी झालेच पाहिजे.हा कार्यक्रम सर्वांचा आहे.या कार्यक्रमाचे चार दिवसापासून नियोजन केलेच पाहिजे.महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यातील सर्व सैनिक संघटनेने एकत्र येवून मतभेद विसरावे.व आपल्या तालुक्यात सर्व तालुक्यातील मान्यवरांना आमंत्रण दिलेच पाहिजे हे तालुक्यातील सैनिक संघटनेच्या अध्यक्ष यांची जबाबदारी आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार २४ व्या कारगील विजय दिवसा निमित्त येणार एकत्र.
0 टिप्पण्या