महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना 1000 सायकल वाटपाचा संकल्प

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना 1000 सायकल वाटपाचा संकल्प

उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा श्री सुरेश (आबा) पालवे पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य,अध्यक्ष पुण्यश्लोक सोशल फाउंडेशन,अजितदादा सोशल फाउंडेशन व यांचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं9730093611
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना 1000 सायकल वाटपाचा संकल्प मा श्री सुरेश (आबा) पालवे पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य,अध्यक्ष पुण्यश्लोक सोशल फाउंडेशन अजितदादा सोशल फाउंडेशन यांनी स्तुत्य अशा उपक्रमाचे आयोजन केले आहे समाजामध्ये आपण काहीतरी देणे लागतो या उद्दात हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल नसल्याने शाळेमध्ये ये जा करण्यासाठी खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, पुण्यश्लोक सोशल फाउंडेशन,अजित दादा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मा श्री सुरेश आबा पालवे पाटील यांनी 1000 सायकल वाटपाचा संकल्प डोळ्यासमोर ठेवला आहे दिनांक 22 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता मा ना श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त सदाशिवनगर येथील शिवामृत मंगल कार्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी मा आमदार श्री संजय (मामा) शिंदे, मा आमदार श्री समाधान (दादा) अवताडे, मा आमदार श्री दीपक (आबा) साळुंखे, कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा श्री उमेश (दादा) पाटील लोकनेते जनतेचे आमदार मा श्री उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते सायकल वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या