मौजे वेळापूर येथील डोंबारी गल्ली येथे सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय उत्तमराव जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व गरीब कुटुंबांना धान्याच्या स्वरूपात शिधा वाटप करण्यात आला. यावेळेस धानोरे गावचे माजी सरपंच जीवन जानकर, वेळापूर गावचे सरपंच रजनीश बनसोडे, युवक नेतृत्व व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे अमोल भैया पनासे, रोहित चव्हाण, महेश साठे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते..
0 टिप्पण्या