नातेपुते ते बारामती बस वेळेवर सोडण्याची मागणी
प्रतिनिधी : नातेपुते.
अकलूज एसटी आगाराचे व्यवस्थापक श्री प्रमोद शिंदे यांना बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देवून अकलूज आगरामधून नातेपुते ते बारामती एसटी बसेस वेळेवर सोडण्याची मागणी केली आहे.यावेळी अनिल साठे,बंडू कांबळे,आनंद मिसाळ,सचिन साळुंखे,इरफान बागवान,आदित्य काकडे उपस्थित होते.नातेपुते आणि त्या परिसरातील ३० ते ३५ खेड्या गावातील जनतेच्या एसटी प्रवासाच्या प्रश्नासाठी किरण साठे मैदानात उतरले असल्याने प्रश्न किती दिवसात मार्गी लागतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अकलूज आगारातील नातेपुते ते बारामती एसटी बसेस प्रवाशांच्या व कामगारांच्या सोयीसाठी सोडल्या जातात परंतु एकही एसटी बस वेळेवर सुटत नाही सुस्थितीत नसलेली एकही बस नातेपुते वरून बारामती साठी सोडत नाहीत,त्यामुळे प्रवाशांना धडधड खडखड करणाऱ्या बसेस मधूनच आपला प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशी वेळेत पोहचत नाहीच,परंतु नाहक त्रासाला सामोरे जावून प्रवास पूर्ण करावा लागतो आहे.माळशिरस तालुक्यात औद्योगिक विकास महामंडळ नसल्याने अर्थात लोकांच्या हाताला काम नसल्याने नातेपुतेसह परिसरात असलेल्या गावातील अनेक तरुण तरुणी रोजगारा निमित्त बारामतीला रोज ये जा करीत असून बसेस वेळेवर सुटत नसल्याने सदर कामगार तसेच शाळेतील मुले वेळेवर पोहोचू शकत नाहीत.त्यामुळे सकाळी सात वाजता नातेपुते येथून बारामतीला बस सोडण्याची कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी केली आहे.
आगार प्रमुख शिंदे यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेवून दुपारी दोनच्या शिफ्ट साठी नातेपुते व परिसरातून जाणाऱ्या लोकांसाठी सदर एसटी बसेस दुपारी दीड पर्यंत बारामती स्टॅन्ड वर गेली पाहिजे या दृष्टीने ही प्रयत्न व्हावेत व बारामती वरून नातेपुते ला येण्यासाठी संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान बारामती मधून नातेपुतेला गाडी सोडण्याची किरण साठेंनी मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
0 टिप्पण्या