प्रतिनिधी : अकलूज : दिनांक १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी माळशिरस तालुक्यातून अकलूज मध्ये हजारो अनुयायी उपस्थित राहत असतात आलेल्या अनुयायांना तसेच समाज बांधवांच्या स्नेह भोजनाची(जेवणाची) व्यवस्था बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण दादा साठे यांच्यामार्फत अकलूजमधील डॉ.आण्णाभाऊ साठे नगर,महर्षी कॉलनी,जुना पंढरपूर रोड अकलूज येथील समाज मंदिरात करण्यात आलेली आहे,सकाळी ११ वाजल्यापासून स्नेह भोजनाला सुरवात करण्यात येणार आहे.
माळशिरस तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या वरती प्रेम करणाऱ्या आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व समाजातील सर्व स्तरातील समाज बांधवांनी आणि सर्वसामान्य जनतेने या स्नेह भोजनाचा आस्वाद आणि लाभ घेण्याचे आव्हान किरण साठे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या