पतीला 'ट्रॅप'मधून सोडविण्यासाठी चित्रा वाघ भाजपात..,?

पतीला 'ट्रॅप'मधून सोडविण्यासाठी चित्रा वाघ भाजपात?

ACB मुंबई युनिटने दाखल केलेल्या केसमधून किशोर वाघ र्निर्दोष सुटतात कां, हे आता पहावे लागणार आहे.......

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक नेत्या आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपले पद आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्यांनी हा निर्णय कां घेतला याची कारणे पुढे येवू लागली आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला विरोधी पक्षाची भुमिका निभावावी लागली. त्याचवेळी चित्रा वाघ या नव्या नेतृत्वाला राष्ट्रवादीने संधी दिली. वाघ यांनी राज्यभर फिरून प्रभाव पाडला. आक्रमक वक्तृत्वामुळे त्यांची छाप पडत होती. त्यांनी महिला आघाडी सक्षम केली होती. मात्र गेले वर्षभर त्या फारशा अॅक्टिव्ह नव्हत्या. लोकसभा निवडणुकीत त्या काही ठिकाणी फिरल्या, पण त्यात पुर्वीचा जोश नव्हता.

त्यांची राजकीय कारकिर्द बहरत असतानाच 2016 मध्ये सरकारी नोकर असलेले त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला. 4 लाखाची लाच घेताना ते पकडले गेले. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पीटलशी संबंधित ते प्रकरण होते.

या प्रकरणातून किशोर वाघ सहीसलामत सुटावेत म्हणून भाजप सरकारची मदत लागणार आहे. या बाबी लक्षात घेवून काही वर्षापुर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि आता भाजप आमदार असलेले प्रसाद लाड यांनी मध्यस्थाची भुमिका पार पाडली. त्यातूनच चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश घडत असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे.त्याना त्यांचा  नवऱ्याला निर्दोष सोडायच आहे मग त्यांना bjp मध्ये जावंच लागेल ना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या