श्री.स्वामी समर्थ विद्यामंदिर शाळेचा छान उपक्रम.पालकाचा चांगला प्रतिसाद
भोसरी (पुणे): मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग,पार्टी,भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला आळा देत मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.अक्षताताई संतोष उकिर्डे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा वारेमाप खर्च न करता शाळेला पुस्तके भेट दिली.असे उपक्रम टागोर शिक्षण संस्था अंतर्गत श्री.स्वामी समर्थ विद्यामंदिर शाळेमध्ये राबवले जातात.या कार्यक्रम दरम्यान शिक्षक राजू पवार सर यांनी सर्व पालकांना विनंती केली की आपल्या पाल्याचा वाढदिवसाचा वायफट खर्च कमी करून शाळेतील मुलाना शालेय उपयोगी वस्तू भेट म्हणुन शाळेला द्यावे,यांचा फायदा पुर्ण शाळेतील मुलांना होईल.याप्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका सौ.मनिषा गुरव मॅडम, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक,श्री.उद्धव ढोले सर,सौ.मनिषा पळसे मॅडम, सौ.वंदना माने मॅडम,श्री.राजू पवार सर, श्री.रामचंद्र चव्हाण सर,सौ.हेमनंदिनी पाटिल मॅडम,सौ.अक्षता उकिर्डे मॅडम,श्री.बाळासाहेब ढेरंगे सर, श्री.किरण थोपटे सर,श्री.हरिश चौधरी सर अदि प्राथमिक,माध्यमिक शिक्षक वर्ग,पालक वर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या