थोर महापुरुषांबद्दल अत्यंत बदनामीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील गोरे यांचे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन

थोर महापुरुषांबद्दल अत्यंत बदनामीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील गोरे यांचे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611

 मनोहर कुलकर्णी उर्फ सभाजी भिडे या व्यक्तीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे. व 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही तिरंगा ध्वज याबद्दल सुद्धा अवमानकारक वक्तव्य केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर ही बेताल वक्तव्य केले आहे. सदरील वक्तव्य अतिशय गंभीर स्वरूपाची आहेत समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. व त्यास मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे जबाबदार असतील. तरी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी ही भावना ओबीसी व बहुजन बांधवांची आहे. व इथून पुढे असे वक्तव्य होणार नाही याची दखल घ्यावी अन्यथा कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका ओबीसी सेल अध्यक्ष सुनील गोरे यांनी तहसीलदार माळशिरस यांना दिले आहे यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास धाईंजे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भीमराव फुले, अरुण ढगे, फोंडशिरस गावचे विद्यमान सरपंच पोपट बोराटे,दिलीप बोराटे, समता परिषदेचे अध्यक्ष सावता बोराटे, कैलास शेंडे, पुण्यनगरी चे माळशिरस तालुका प्रतिनिधी श्रीमंत बनकर,गणेश शेंडे, विशाल शेंडे,सौरभ रणदिवे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या