किरण साठेंच्या पाठपुराव्याला मिळाले यश !
प्रतिनिधी : नातेपुते : अकलूज एसटी आगाराचे व्यवस्थापक श्री प्रमोद शिंदे यांना बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देवून अकलूज आगरामधून नातेपुते ते बारामती एसटी बसेस वेळेवर सोडण्याची मागणी केली होती.
किरण साठेंनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याचे विभाग नियंत्रक यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी संदर्भात कळविले होते.
किरण साठेंच्या मागणीची दखल घेवून सोलापूर जिल्ह्याचे नियंत्रक यांनी नातेपुते ते बारामती सकाळी ६.१५ वाजता,सुटून बारामतीमध्ये ७.१५ ला पोहचणार,बारामती ते नातेपुते ७.३० वाजता सुटून ८.३० ला नातेपुते मध्ये पोहचणार,नातेपुते ते बारामती ९.०० वाजता सुटून बारामतीमध्ये १० ला पोहचणार,बारामती ते नातेपुते १०.१५ वाजता सुटून नातेपुते मध्ये ११.१५ वाजता पोहचणार नातेपुते ते अकलूज गाडी ११.३० वाजता सुटणार आहे.आशा सकाळ सत्रात गाड्या च्या फेऱ्या सुटणार आहेत.दुपार सत्रात अकलूज ते नातेपुते २.१५ वाजता सुटून नातेपुते येथे ३.१५ ला पोहचणार,नातेपुते ते बारामती ३.३० ला सुटून ४.३० ला पोहचणार,बारामती ते नातेपुते ४.४५ ला सुटून ५.४५ ला नातेपुते मध्ये पोहचणार,नातेपुते ते बारामती ६.०० सुटून बारामती मध्ये संध्याकाळी ७ वाजता पोहचणार,बारामती ते नातेपुते गाडी ७.१५ ला सुटून नातेपुते मध्ये संध्याकाळी ८.१५ मिनिटांनी पोहचणार अशी वाहतुकीची व्यवस्था केली आहे.
किरण साठेंच्या पाठपुराव्यामुळे नातेपुते ते बारामती बसच्या वेळेचा प्रश्न मार्गी लागला असून किरण साठे यांनी केलेल्या कामाचे जनतेतून कौतुक केले जात आहे.
0 टिप्पण्या