अन्यथा 14 ऑगस्ट रोजी भांबुर्डी येथे शाळेसमोर भ्रष्ट शासनाच्या निषेधार्थ आमरण उपोषण करण्यात येणार ?
मुख्यालयी न राहणा-या मौजे भांबुर्डी
गावातील जि.प.प्रा. शाळा सर्व शाळा या शिक्षकांवर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून यामध्ये निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की
शासनाचे नियमानुसार शिक्षकांनी त्यांचे कर्तव्याच्या ठिकाणी मुख्यालयी राहवे असा नियम घालुन दिलेला असताना येथील शाळेचे शिक्षक मात्र येथून परगावी राहत आहेत. ते शाळेत वेळेत पोहचतही नाहीत. शिवाय एकमेकांच्या समंतीने व सोयीने सुट्टी घेतात. कामाचे दिवशी मधुनच येणे-जाणे असे प्रकार निदर्शनास येत आहे.
विद्यार्थ्यांची प्रगती ही म्हणावी अशी खास नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे जादा तास घेऊन अप्रगत विद्यार्थी कसे प्रगत होतील याची काळजी घेणे गरजेचे आहे.
म्हणुनच या शासनाची फसवणुक करणा-या व मुख्यालयी न राहणा-या शिक्षकांवर कारवाई करावी. अन्यथा दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी आपले भ्रष्ट शासनाचे निषेधार्थ आमरण उपोषण शाळेसमोर करणार असल्याचे निवेदन प्रशांतभाऊ धाईंजे बहुजन समाज पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या