किरण साठे कोणत्या नव्या भूमिकित येणार ? राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचे दिले संकेत...

किरण साठे कोणत्या नव्या भूमिकित येणार ? राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचे दिले संकेत... 


नातेपुते येथील मेळाव्यातील भाषण आले चर्चेत

प्रतिनिधी : बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पाचव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नातेपुते येथे संघटनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा झाला,कार्यक्रमात कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.आजपर्यंत संघटनेच्या झालेल्या कार्यक्रमापैकी नातेपुते येथील कार्यक्रम रेकॉर्ड ब्रेक झाला.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी माळशिरस तालुक्यात असलेली त्यांची वैयक्तिक ताकद दाखवून पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कार्यक्रमला संबोधित करताना भाषणामध्ये किरण साठे यांनी लवकरच नव्या भूमिकेत येणार असल्याचे जाहीर करून टाकल्याने तालुक्यातील राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. किरण साठे यांची नवी भूमिका कोणती असेल ? किरण साठे काय निर्णय घेणार ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा देणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अचानकपणे किरण साठे यांनी भर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत,त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे,किरण साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून चांगले काम केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यात किरण साठेंचा सिंहाचा वाटा आहे.माळशिरस तालुक्यात किरण साठे यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास कुणाला फायदा होईल आणि कुणाला तोटा होईल हा येणारा काळच ठरवेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या