क्रांतिकारी संघर्ष सेना, महाराष्ट्र राज्य, सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.गणेश (भाऊ)भोसले साहेब, यांनी संघटनेची देह धोरण आगामी काळातील वाटचालींबद्दल पुढील प्रमाणे मांडले .मागासवर्गीय समाजावरील अन्याय अत्याचार,लगाम लावणे, आगामी काळात होणाऱ्या दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजीच्याआद्या क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या जयंतीचे नियोजन, कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडचणी समजून घेण्यात आले. विविध समाजाचे आर्थिक विकास महामंडळाची कर्ज प्रकरण घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकांनी उद्योजक बनले पाहिजे असा संदेश देण्यात आला. संविधानाने दिलेले धर्मनिरपेक्षता मनात बाळगून विविध जाती धर्म एकोपा करण्यासाठी प्रयत्न करावे. दलित वस्त्यांमध्ये दलित वस्त्यांमधील चालू, व चालू होणारी विकास कामे लक्ष घालून मजबूत परिपक्व करून घेण्यात यावीत.मा.श्री.सोनू (भाऊ )ढावरे, यांनी कोणत्याही ठिकाणी समाज बांधवांवर अन्याय झाल्यास फोन करा त्या ठिकाणी जशास तसे उत्तर दिले जाईल असे मत मांडण्यात आले. मा.श्री.योगेश (तात्या )मिसाळ, इंदापूर तालुक्याच्या वतीने आद्य क्रांतिक गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची सामूहिक जयंती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात यावी. व आगामी काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.मा.श्री.विजयकुमार कदम साहेब, राज्य कार्याध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना, संघटनेची देह धोरण सविस्तर द्या सर्वांना याची माहिती दिली.मा.श्री.आनंद (भाऊ) दळवी, माळशिरस तालुका अध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना.मा.श्री.अमोल (दादा) भोसले, इंदापूर तालुका अध्यक्ष, मा श्री सुभाष उर्फ बापू भोसले इंदापूर तालुका उपाध्यक्ष,क्रांतिकारी संघर्ष सेना,मा.श्री.मोहन खंडाळे, माढा तालुका अध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना,मा.श्री.रमेश (भाऊ )बागाव, सोलापूर जिल्हा अध्यक्ष आधुनिक लहुजी शक्ती सेना,मा.श्री.अक्षय खंडाळे, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे जयंती आढेगाव , मा.श्री.पांडुरंग दळवी अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बाभुळगाव ,ओम मिसाळ,दत्ता गरड, मच्छिंद्र दळवी,सचिन दळवी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या