नातेपुते येथे ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ एकशीव संचलित गोविंद औद्योगिक प्रशिक्षण संस्था नातेपुते येथे नूतन प्रशिक्षणार्थी यांचे संस्थेच्या वतीने स्वागत
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
नातेपुते येथील ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, एकशिव संचलित गोविंद औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नातेपुते या ठिकाणी नूतन प्रशिक्षणार्थी यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.गोविंद औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नातेपुते चे श्री.बाजीराव चोपडे सर माहिती देताना म्हणाले की मा.आमदार रामहरी गोविंद रुपनवर यांनी या आय टी आय ची स्थापना सन 2009-10 मध्ये केली असून ह्या संस्थेचे चेअरमन डॉ. आदिनाथ भैय्या रुपनवर हे आहेत या संस्थेने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत. 2009 पासून आज पर्यंत 700 पेक्षा जास्त मुलांनी येथून व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपला आर्थिक विकास करीत आहेत. मागील 2 वर्षात कोविड च्या काळात संस्थेत विद्यार्थी संख्या कमी होती परंतु ह्या वर्षी पुन्हा नव्या जोमाने वाटचाल सुरु केल्यामुळे परिसरातील बऱ्याच विध्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे व जास्तीत जास्त नवीन प्रवेश झाले व अजूनही प्रवेश सुरूच आहेत. माळशिरस तालुक्यात महावितरण मध्ये सर्वात जास्त गोविंद आय टी आय चे विद्यार्थी कार्यरत असल्याचे प्रतिपादन चोपडे सरांनी केले. यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना आय टी आय करिअर बद्दल मार्गदर्शन प्राचार्य श्री.कर्ने सर यांनी केले तसेंच नूतन शिक्षक श्री.नाळे सर यांचेही स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले. स्वागत समारंभात विद्यार्ध्यांना गुलाबपुष्प व वेलकम गिफ्ट देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमित नाळे सर यांनी केले यावेळी प्राचार्य श्री.कर्णे सर, श्री.चोपडे सर, श्री.गेंड सर, श्री.कोरबू सर ,श्री.नाळे सर सौ.शुभांगी मॅडम उपस्थित होते.
0 टिप्पण्या