महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा लोगोचे अनावरण

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा लोगोचे अनावरण 

प्रतिनिधी : : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची पक्षप्रमुख किरण साठे यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली अकलूज येथील विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.पक्षाच्या लोगोचे अनावरण पक्षप्रमुख किरण साठे आणि जेष्ठ कार्यकर्ते दत्तू बुवा वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले.बैठकीला मविसेचे नेते दत्ता कर्चे,बापू वाघमारे,अजित साठे,डॉ लोखंडे,धनाजी पाटील,राजेश खरे,शिवाजी शिंदे,रफिक मुलाणी,जावेद पठाण,रफिक सय्यद,अतुल पवार,सुरज मोहिते,बापू बुधावले,सचिन रणदिवे,योगेश वाघमारे,शंकर वाघमारे,महेंद्र साठे,प्रवीण भिसे,वाल्मिक रणदिवे,राहुल खिलारे,सागर अडगळे,मल्हारी आष्टूळ,अजय अडगळे,दीपक खंडागळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


सदर बैठकीत दत्ता कर्चे,अनिल साठे,सचिन रणदिवे,सचिन खिलारे,बापू वाघमारे,डॉ लोखंडे, दत्तू बुवा वाघमोडे,अजित साठे यांनी पक्षाच्या माध्यमातून पुढील नियोजन करण्यासंदर्भात सुचनापर मनोगत व्यक्त केले.

बैठकीला उपस्थित असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना पक्षप्रमुख किरण साठे यांनी पक्षाची ध्येय धोरणे सांगून पक्ष वाढीसाठी जे काम करणारे कार्यकर्ते आहेत अशाच कार्यकर्त्याना पदे दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.पक्षाच्या माध्यमातून जनतेला भेडसावत असलेल्या प्रश्नावर आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या.कार्यक्रमाचे प्रस्तावित दत्ता कर्चे यांनी केले तर आभार राजेश खरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या