महाराष्ट्र विकास सेना पक्षाची अकलूजमध्ये रविवारी बैठक - दत्ता कर्चे

महाराष्ट्र विकास सेना पक्षाची अकलूजमध्ये रविवारी बैठक - दत्ता कर्चे  
प्रतिनिधी : अकलूज : महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्थापना १/५/२३ रोजी करण्यात आली आहे तसेच निवडणूक आयोगाने दिनांक ११/९/२३ रोजी पक्षाची नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र पक्ष प्रमुख किरण साठे यांना दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पक्ष प्रमुख किरण साठे यांच्याबरोबर अविरतपणे काम करणारे सहकारी आणि एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच बाकी पक्षांवर नाराज असलेले क्रिएसील कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र विकास सेनेचे नेते दत्ता कर्चे यांनी दिली आहे,नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पक्षाची पुढील दिशा,नियोजन,कार्यक्रम ठरविण्यासाठी पक्षप्रमुख किरण साठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपस्थितीत अकलूज गेस्ट हाऊस या ठिकाणी सकाळी ठिक 9:30 वाजता बैठक आयोजित केली असल्याचे तसेच सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे दत्ता कर्चे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या