संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करा आंदोलनकर्त्यांची मागणी
मौजे फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील बाणलिंग वनराई मध्ये सन २०२०-२१, २०२१- २२ या आर्थीक वर्षात या गटामध्ये रोपांची लागवड करण्यात आली असून सदर काम हे सोलापूर वनविभाग सोलापूर वनपरिक्षेत्र माळशिरस यांच्या अंतर्गत झाले असून सदर योजना निष्कुष्ठ वनाचे पुर्नवनीकरण (RDF) २४०१-३२०१ PMW_ या योजने अंतर्गत झाले असून या गटामधील रोपे मोठया प्रमाणात जळालेली दिसुन येत आहेत तरी या गटामध्ये किती रोंपाची लागवड झाली किती रोपे जळून गेली व किती रोपे अस्तित्वात आहेत याची चौकशी आपण आमच्या समक्ष करावी दि. २५/०९/२०२३ पर्यंत या निवेदनाच्या अनुषंगाने आपण चौकशी न केल्यास नाईलाजास्तव दि. २७/०९/२०२३ रोजी मा. तहसिल कार्यालय माळशिरस येथे आपल्या विरोधामध्ये हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले होते सदर निवेदनाच्या अनुषंगाने दखल घेतली नसल्याने तहसील कार्यालय माळशिरस येथे माहिती सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप (भाऊ) लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन रणदिवे व सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक रणदिवे यांच्या वतीने हलगीनाद आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र विकास सेनेचे पक्षप्रमुख किरण साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे,क्रांतिकारक संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले, वंचित नेते श्रीकांत सावंत,खादी ग्राम उद्योग माळशिरस चेअरमन दत्ता सावंत, युवा नेते भैया धाईंजे,धनाजी साठे, महादेव कोळी क्रांती सेना संगम दीपक लावंड,पुणे जिल्हा मातंग समाजाचा ढाण्या वाघ सोनू डावरे, बावडा सामाजिक कार्यकर्ते ललू गायकवाड, आधुनिक लहुजी सेना वडवली जिल्हाध्यक्ष सोलापूर रमेश बागाव, क्रांतिकारी संघर्ष सेना कार्याध्यक्ष तथा पत्रकार विजयकुमार कदम,रणजीत आवारे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नानासाहेब काळे, मिलींद वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब भिसे,बाबासाहेब भिसे,किरण तूपसौंदर,विशाल तुपसौंदर यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला. सदर गटाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची निलंबन करा अशी आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली आहे.
0 टिप्पण्या