विभाग नियंत्रकानी किरण साठेंच्या मागणीची घेतली दखल

विभाग नियंत्रकानी किरण साठेंच्या मागणीची घेतली दखल 

माळशिरस येथे दोन वाहतूक नियंत्रकाची केली नेमणूक 
प्रतिनिधी – सोलापूर : विभाग नियंत्रक रा.प.सोलापूर यांना किरण साठे यांनी माळशिरस बस स्थानक येथे दोन वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करणेबाबत निवेदन सादर केले होते,तसेच ५ सप्टेंबर रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्याची दखल घेवून सोलापूर रा.प चे विभाग नियंत्रक यांनी बसस्थानकावर अतिरिक्त वाहतूक नियंत्रक यांची नेमणूक करणे ही धोरणात्मक बाब आहे,नवीन मंजुरी मिळेपर्यंत माळशिरस बसस्थानकावर सद्या नेमणूक असलेल्या वाहतूक नियंत्रक व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार एका अन्य वाहतूक नियंत्रक यांची नेमणूक करण्यासाठी अकलूज आगार व्यवस्थापक यांना कळीवले असल्याचे लेखी पत्र किरण साठेना दिले आहे.साठेंच्या मागणीनुसार ४/९/२३ रोजी माळशिरस बसस्थानक येथे शाहीर तांबोळी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असून तेथील लोकसंख्या किमान ३४ हजार इतकी आहे,तसेच माळशिरस शहरात नगरपंचायत असून न्यायालय,पंचायत समिती तहसील कार्यालय,तालुका कृषी कार्यालय,पाटबंधारे कार्यालय आहेत.तसेच तालुक्यातील इतर प्रमुख कार्यालये माळशिरस शहरांमध्ये अस्तित्वात आहेत.त्यामुळे प्रवाशांची येण्या जाण्यासाठी खूप मोठी वर्दळ अथवा गर्दी असते सद्या माळशिरस बस स्थानक येते सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत फक्त एकच वाहतूक नियंत्रक होता.

संध्याकाळी ६ वाजलेनंतर असंख्य बसेस बस स्थानकाच्या बाहेरूनच जातात त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत.प्रवाशांचे होणारे हाल त्वरित थांबविण्यासाठी माळशिरस बस स्थानक येथे सकाळी ६ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत असे दोन वाहतूक नियंत्रक नेमण्यात यावेत अशी मागणी किरण साठेंनी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या