निलराज मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री निलराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून त्यांचा 35 वा वाढदिवस त्यांच्या जन्म गावी मांडवे या ठिकाणी निलराज मित्र परिवारावर प्रेम करण्याऱ्या सर्व तरुण मित्रांनी वाढदिवस साजरा केला
एक सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवस चे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा मांडवे येथील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते 251 रक्तदात्यांनी रक्तदान करून कोणाचा तरी जीव वाचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला रक्त संकलन नातेपुते येथील ज्ञानदीप ब्लड बँकेच्या मार्फत करण्यात आले
त्याचप्रमाणे सर्वाना भोजन व्यवस्था सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आली होती
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या
0 टिप्पण्या