स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या दणक्याने सहाय्यक गटविकास अधिकारी व बांधकाम विभागाचे उपअभियंता आले पिसेवाडी गावात..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या दणक्याने सहाय्यक गटविकास अधिकारी व बांधकाम विभागाचे उपअभियंता आले पिसेवाडी गावात..
स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष अजित (भैय्या)बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख साहिल आतार घेणार आक्रमक भूमिका..

प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611

माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री गुळवे साहेब यांनी पिसेवाडी गावामध्ये झालेल्या भ्रष्ट कामासंदर्भात सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे व बांधकाम विभागाचे उप अभियंता आर. एस. रणवरे यांना दिनांक 28-08- 2023 रोजी चौकशीचे आदेश दिले होते त्याप्रमाणे सहाय्यक गटविकास अधिकारी व उपाभियंता बांधकाम विभागा यांनी पिसेवाडी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख साहिल आतार व गावातील ज्येष्ठ नागरिकांसोबत झालेल्या कामांची चौकशी केली चौकशी दरम्यान सदर काम हे इस्टिमेट प्रमाणे झाले नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख साहिल आतार व पदाधिकारी यांनी लक्षात आणून दिले. या प्रकरणांमध्ये संबंधित ग्रामसेवक व बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातून वार सोमवार दिनांक 04- 09-2023 रोजी उठणार नाही अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख साहिल आतार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांना घेतला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका विधानसभा प्रमुख साहिल आतार यांनी माहिती सेवाभावी टाइम्स यांच्याशी बोलताना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या