पुरंदावडे गावातील विविध विकास कामाबाबत ग्रामसभेमध्ये सकारात्मक चर्चा..
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
मौजे पुरंदावडे या ठिकाणी आज दिनांक -31-08-2023 रोजी सरपंच सौ राणी बापु मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न झाली. पुरंदावडे या ठिकाणी मुख्यमंत्री सौर योजना मंजुर असून त्याला ग्रामसभेने बहुमताने टाळ्यांच्या गजरात गट नं ६५ मधील जमीन ५ एकर जागा सौरऊर्जेसाठी मंजुरी देण्यात आली विविध विकासकामाबाबत सकारात्मक चर्चा होऊन सर्व विषयाला बहुमताने मंजुरी देणेत आली या सभेकरिता पी. आर.लोंढे विस्तार अधिकारी निरिक्षक म्हणून हजर होते या सभेकरिता उपसरपंच, सदस्य, मा सरपंच,व्हाईस चेअरमन,मा. उपसरपंच, सोसायटी चेअरमन, मा. सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष व समस्त ग्रामस्थ मोठ्या संस्थेने उपस्थित होते. सर्व विषयांचे वाचन ग्रामसेविका दिक्षित मॅडम यानी केले या सभेकरिता पी आय टाकणे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली API. मोहिते साहेब व बीट अंमलदार घोगरे साहेब व त्यांचे सर्व सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 टिप्पण्या