इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ श्रद्धा जवंजाळ तर सचिव पदी डॉ. आदिती थिटे

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ श्रद्धा जवंजाळ तर सचिव पदी डॉ. आदिती थिटे
सत्यप्रभादेवी मोहिते पाटील व सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांची उपस्थिती

प्रतिनिधी-सचिन रणदिवे
मो नं 9730093611

    सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अकलूज इनरनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. श्रद्धा राहुल जवंजाळ यांची दुसऱ्यांदा तर डॉ. अदिती थिटे यांची सचिव पदी निवड झाली अकलूज येथे रविवार दि 27 ऑगस्ट रोजी झालेल्या पदग्रहण सोहळ्यासाठी सत्यप्रभादेवी रणजीतसिंह मोहिते पाटील व सिने अभिनेते मिलिंद गुणाजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक चेअरमन मुक्ती पानसे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

  संपूर्ण जगभर सामाजिक काम करणाऱ्या इनरव्हील क्लबला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली असून अकलूज इनरव्हील क्लबच्या शाखेला 25 वर्ष पूर्ण झाली असून या निमित्ताने अकलूज इनरव्हील क्लब च्या वतीने 23 शिक्षकांना शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर नेशन बिल्डर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये प्रा विश्वनाथ आव्हाड, अल्बर्ट ठकरान ,बिनो पॉल्स, सारंगा गिरमे महादेव राजगुरू ,अर्चना कामेगावकर, गिरीजा नाईकनवरे ,शहजादी काझी यासह इतर शिक्षकांना सन्मानित करण्यात आले
 यावेळी इनरव्हील क्लबच्या उपाध्यक्षपदी शीतल दळवी ,खजिनदारपदी जयश्री पोटे, आयएसओ अमोलिका जामदार ,एडिटर पदी शुभदा पोटे ,सी एल सी मेघा जामदार यांची नियुक्ती करण्यात आली 

  महिलांमधील कॅन्सर वर प्रभावी ठरणाऱ्या एचपीव्ही व्हॅक्सिनेशन मोफत करून सर्वाइकल कॅन्सरवर विशेष योगदान दिल्याबद्दल इनरव्हीलच्या 72 क्लबमधून डॉ श्रद्धा जवंजाळ यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आले तर या कामी त्यांना सहकार्य करणारे डॉ श्रीकांत देवडीकर डॉ मानसी देवडीकर डॉ कविता कांबळे यांनाही यावेळी गौरविण्यात आले यावेळी बोलताना सिने अभिनेते मिलिंद गुणाजी म्हणाले की, अकलूजच्या इनरव्हील क्लबचं काम कौतुकास्पद असून अकलूज आणि माझं नातं जुनंच आहे इनर व्हील क्लबच्या माध्यमातून डॉ श्रद्धा जवंजाळ आणि त्यांच्या सर्व सहकारी करीत असलेल्या कामाबद्दल त्यांनी अभिनंदन केले

चौकट

    डॉ श्रद्धा जवंजाळ आणि त्यांच्या इनर व्हील क्लबने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर 23 शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित केलं याबद्दल मी इनरव्हील क्लबचं मनःपूर्वक धन्यवाद मानते याच इनरव्हील क्लबच्या माध्यमातून माझ्या आई काम करीत होत्या यामुळे माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून डॉ श्रद्धा जवंजाळ करीत असलेल्या सामाजिक कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा


   सत्यप्रभादेवी रणजीतसिंह मोहिते पाटील

फोटो मेल

ओळी

अकलूज इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदाचा कार्यभार डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांच्या हस्ते घेताना डॉ श्रद्धा जवंजाळ यावेळी सत्यप्रभादेवी रणजीतसिंह मोहिते पाटील व सिने अभिनेते मिलिंद गुणाजी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या