आमदार रामभाऊ सातपुते यांनी लक्ष देण्याची नागरिकांतून मागणी

आमदार रामभाऊ सातपुते यांनी लक्ष देण्याची नागरिकांतून मागणी 
माळशिरस मधील नॅशनल बँका मध्ये बँक खाते काढण्यासाठी महिना ते दोन महिने लागतात
आमदार रामभाऊ सातपुते यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे 

बँक शाखाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची गैरसोय होतेय

माळशिरस मधील मिनी बँक चालक यांचा ही मनमानी कारभार, नागरीक त्रस्त 

प्रतिनिधी -माळशिरस सचिन रणदिवे
मो नं 9730093611

देशाला स्वातंत्र्य मिळवून 76 वर्ष होऊन गेली तरी माळशिरस मधील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये बँक खाते काढण्यासाठी नागरिक गेल्या नंतर त्यांना मिनी बँके कडे खाते काढण्यासाठी पाठविले जाते. तेथे गेल्यानंतर सर्व्हर बंद आहे नंतर या असे सांगितले जाते. त्यानंतर नागरीकानी चार पाच हेलपाटे मारल्या नंतर मिनी बँकवाला कागदपत्रे जमा करून घेतो व नंतर येण्यास सांगतो. नागरीक ज्या ज्या वेळी हेलपाटे मारतो त्या त्या वेळी त्याला सर्व्हर बंद आहे असे सांगितले जाते. माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे शासकीय कार्यालये मोठया प्रमाणात आहेत त्यामुळे शासकिय कर्मचाऱ्यांसह शेतकरी वर्ग व विद्यार्थी यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. विद्यार्थांना शैक्षणिक लाभासह अन्य लाभ मिळण्यासाठी नॅशनल बँकेचे बँक खाते काढा म्हणून शाळेतून सांगितले जाते परंतु त्या विद्यार्थ्याला तब्बल दोन दोन महिने बँक खाते उघडून मिळत नाही. त्यामुळें शालेय विद्यार्थ्याला शासनाच्या अनेक लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
आरबीआयच्या नियमानुसार बँके मध्येच बँक खाते काढूण देण्याचा नियम असुन सुधा आरबीआयच्या नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे.शाखाधिकारी व बँक कर्मचारी यांच्या आदडमुठे पणामुळे बँकेत खाते काढूण दिले जात नाही. त्यामुळें माळशिरस व परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी आमदार राम सातपुते यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून बँकेतून नागरिकांना खाते काढूण दिले जावे अशा सूचना आमदार रामभाऊ सातपुते यांनी हेड ऑफिस ला कळवून माळशिरस मधील बँकांना आदेश देण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या