स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात क्रांतिकारी संघर्ष सेनेचे आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन..

स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात क्रांतिकारी संघर्ष सेनेचे आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन..
स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा चेंडू ग्रामविकास विभागाचे उपसचिव पंडित जाधव साहेब यांच्या दालनात?
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611

श्रीमती स्मिता पाटील या २०१८ ते २०२१ या कालावधीत जि.प. सोलापूर मधील माळशिरस गटात गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. त्या कालावधीत त्यांनी केलेल्या अनियमिततेबाबत जि.प. सोलापूर यांच्याकडून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. श्रीमती स्मिता पाटील यांनी जि.प. सोलापूर कडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) या पदावर विनंती बदलीने पदस्थापना दि. २६ जुलै २०२३ रोजी शासन आदेशानुसार दिली आहे. तर त्या स्वतःच स्वतःच्या विभागीय चौकशी करिता सादरकर्ता अधिकारी होतील केव्हा त्या त्यांची विभागीय चौकशी चे मूळ अभिलेख गहाळ किंवा नष्ट करू शकतात. तशी धमकी त्यांनी विभागीय चौकशीतील परिशिष्ट-३ मधील साक्षीदारांना दिली आहे. महोदय, आपणास या अर्जाद्वारे नम्र विनंती करतो की, श्रीमती स्मिता पाटील या अत्यंत मुजोर अधिकाऱ्याला जि.प. सोलापूर कडे पदस्थापना देण्यात आली असून ती रद्द करण्यात यावी. अन्यथा संविधानिक मार्गाने कायदेशीर आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी क्रांतिकारी संघर्ष सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येणार होते.याची नोंद संबंधित प्रशासनाने गांभीर्यापूर्वक न घेतल्याने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने.आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास येणार होतो. परंतु अपरिहार्य कारणास्तव ते सध्या रद्द करण्यात आले आहे.परंतु.दि.०६/०९/२०२३ रोजी वार बुधवार पुन्हा बेमुदत धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे मुदतीपर्यंत कारवाई न झाल्यास करण्यात येणार आहे. याची संबंधित प्रशासनाने पुन्हा एकदा नोंद घ्यावी ही नम्र विनंती आहे. विनंती करून देखील अद्याप पर्यंत कारवाई न झाल्याने नाईलाजस्तव आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 6 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे श्रीमती स्मिता पाटील, गटविकास अधिकारी चंद्रपूर यांना विनंती बदलीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जि.प. सोलापूर येथे पदस्थापना न देणे व असा शासन आदेश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी क्रांतिकारी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले यांनी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन केले आहे याप्रकरणी पंडित जाधव साहेब उपसचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी सदरचे निवेदन वरिष्ठाकडे पाठवू असे आश्वासन क्रांतिकारी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले यांना दिले आहे यावेळी श्री दिपक (आबा)लावंड महादेव कोळी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष,श्री विजयकुमार कदम साहेब क्रांतिकारी संघर्ष सेना राज्य कार्याध्यक्ष,श्री पोपट दळवी संघटक माळशिरस तालुका क्रांतिकारी संघर्ष सेना उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या