कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह (दादा) मोहिते-पाटील यांनी निवडणूकीत दिलेले आश्वासन केले पुर्ण..

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह (दादा) मोहिते-पाटील यांनी निवडणूकीत दिलेले आश्वासन केले पुर्ण..

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या, अकलूज येथील पेट्रोलपंपावर CNG 24 तास उपलब्ध
प्रतिनिधी- सचिन रणदिवे
मो नं 9730093611

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह दादा मोहिते-पाटील यांनी निवडणूकीत दिलेले आश्वासन पूर्ण केलं असुन कृषी उत्पन्न बाजार समितीने अकलूज बायपास रोड येथील पेट्रोलपंप सुरू केलेला असून त्यास शेतकरी व ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये सी. एन. जी. सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. अकलूज- पुणे, अकलूज- सोलापूर करीता दररोज मोठ्या प्रमाणात वाहने (कार) जात असतात. त्याच बरोबर तालुक्यामध्ये पंचक्रोशीमध्ये सी.एन.जी.ची सेवा उपलब्ध नसल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन मा. श्री. विजयसिंह मोहिते- पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह दादा मोहिते-पाटील, उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथे ३१ मार्च २०२३ रोजी सी. एन. जी.ची सेवा उपलब्ध करून दिली होती. ग्राहकांच्या मोठ्या मागणीमुळे सी.एन.जी. पूर्ण क्षमतेने देता येत नव्हता. परंतू आता २४ तास सी. एन. जी. विक्री चालु केली आहे. याचा लाभ सर्व सी. एन. जी. वाहन धारकांनी घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या