आधी मराठा आरक्षण,मगच गावचं पुढारीपण.

आधी मराठा आरक्षण,मगच गावचं पुढारीपण.

समस्त चिंचोलीकर यांचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा.
शिरूर : संतोष उकिरडे 

शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची गावाने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समस्त ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे.महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजबांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.अनेक ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांनाही गावबंदी करण्यात आली आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये गाव बंदी केल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना याचा फटका बसत आहे. चिंचोली मोराची मधून आज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत पुढार्‍यांना गाव बंदी करण्यात आली. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी असल्याचे समस्त चिंचोलीकर यांनी आज आंदोलनास पाठिंबा देत सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या