राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका सरचिटणीस ऋतिक बाळासाहेब कुंजीर यांनी उपोषण करते दीपक नाना काकडे यांच्याकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून दिला राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका सरचिटणीस पदाचा राजीनामा


राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका सरचिटणीस ऋतिक बाळासाहेब कुंजीर यांनी उपोषण करते दीपक नाना काकडे यांच्याकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून दिला राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका सरचिटणीस पदाचा राजीनामा


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांद्वारे श्रीक्षेत्र थेऊर येथे सुरु असलेल्या साखळी उपोषण स्थळी भेट देऊन उपस्थित मराठा बांधवांशी संवाद साधला. 
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मराठा समाजाला प्रगतीच्या समसमान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरक्षण मिळणे आवश्यक असून मराठा समाजाला आर्थिक- सामाजिक मागास गटात स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देन्याचा निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातील महायुती शासनाने घेतला होता त्याला मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी देखील दिली होती परंतु महाविकास आघाडी शासनाने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने हाताळला नाही व दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकू शकले नाही.
 
सर्व कायदेशीर बाबी तपासून टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री मा. ना. एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब व महायुती शासन अनुकूल असून शासनस्तरावर याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे नमूद केले. 

मराठा आरक्षणाबाबत आपण सातत्याने आवाज उठविला असून समाजाला कायदेशीररित्या टिकाऊ आरक्षण मिळावे यासाठी शासन लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेईल याकडे लक्ष वेधण्यात आले तसेच येणाऱ्या काळात देखील मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन दरबारी योग्य पाठपुरावा व्हावा यासाठी कटिबद्ध असण्याचा विश्वास ऋतिक बाळासाहेब कुंजीर यांनी बोलताना व्यक्त केला त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका सरचिटणीस या पदाचा राजीनामा उपोषण करते दीपक नाना काकडे यांच्याकडे दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या