मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सकल मातंग समाज माळशिरस तालुका यांचा जाहीर पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सकल मातंग समाज माळशिरस तालुका यांचा जाहीर पाठिंबा
प्रतिनिधी/ माळशिरस 

मराठा आरक्षणासाठी परिवर्तन विचाराचे श्री. मनोज जरांगे पाटील यांनी या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उपोषण करत आहेत मराठा समाजाचे राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र मराठा समाजास आरक्षण नसल्याने गरीब कुटुंबातील मराठा मुला- मुलींचे खूप मोठे नुकसान होत आहे स्पर्धा परीक्षेमध्ये व शिक्षण व्यवस्थेमध्ये आरक्षण नसल्याने त्याचं संपूर्ण आयुष्य हे वेगळ्या वळणावर जात आहे त्यामुळे मराठा समाजातील मुला मुलींच्या भविष्यासाठी त्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. परिवर्तनाचे मानबिंदू ठरलेले संघर्ष योद्धा मा श्री मनोजजी जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सरकारने सकारात्मक विचाराने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा म्हणून सकल मातंग समाज माळशिरस तालुका यांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी अनुसूचित जाती जमाती बचाव समिती अध्यक्ष सुधीर (भाऊ) साठे, भूमीहिन कामगार शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष नानासाहेब रणदिवे, राष्ट्रीय मानव संगोपन संस्थापक अध्यक्ष तानाजी साठे, महाराष्ट्र विकास सेना महाराष्ट्र राज्याचे समन्वयक अजित (दादा) साठे,माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे,रोखठोक न्यूजचे मुख्य संपादक मकरंद साठे, महाराष्ट्र मातंग परिषदेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक रणदिवे, क्रांतिकारी संघर्ष सेना सोलापूर जिल्हा संघटक बापूराव वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते बंडू कांबळे, साप्ताहिक माळशिरस पॅटर्न, जनसत्ता मराठी न्यूज मुख्य संपादक व माहिती सेवाभावी संस्था सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन रणदिवे, क्रांतिकारी संघर्ष सेना माळशिरस तालुका अध्यक्षा रुक्मिणीताई रणदिवे यांच्यासह आधी मातंग समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माळशिरस या ठिकाणी साखळी उपोषणामध्ये सामील झालेले सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या