नातेपुते पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी. जबरी चोरी करणारा आरोपी केला अटक.

नातेपुते पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी. जबरी चोरी करणारा आरोपी केला अटक.

प्रतिनिधी/नातेपुते 

नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे नातेपुते माळशिरस येथे दिनांक ०९/०९/२०२४ रोजी दुपारी ०३:१५ वा. सुमारास अज्ञात इसमाने फिर्यादीत नातेपुते येथील शिवशंकर बाजार समोर मी तुम्हाला कमी किमतीमध्ये डस्ट देतो माझे सोबत चला असे म्हणून फिर्यादीस नातेपुते शहरातील मधुर मिलन मंगल कार्यालयापासून ०१ किमी अंतरावर बंडगर खोरी येथे नेऊन फिर्यादीस शिवीगाळी व दमदाटी करून खिशात असणारे सर्व पैसे मला दे असे म्हणून फिर्यादीच्या तोंडावर बुक्क्या मारून फिर्यादीचे दोन दात पाडून फिर्यादीच्या खिशातील ५०० रू दलाच्या एकुण १० नोटा असे ५०००/रूपये जबरदस्तीने काढून घेऊन फिर्यादीची २५०००/ रू किमतीचे मोटरसायकल Honda कंपनीची Activa त्याचा आरटीओ नंबर MH45-AJ-5103 ही जबरदस्तीने फिर्यादी कडून घेऊन तेथून अज्ञात आरोपी पळून गेला आहे त्याबाबत फिर्यादी नामे रामचंद्र बबन रानगट रा.कारंडे ता.माळशिरस यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३०३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४),३०९ (६),३५२,३५१ (२)(३) प्रमाणे दिनांक ११/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई/ धनाजी ओमासे करित आहेत.

नातेपुते पोलीस ठाणेचे पोना/५६२ राकेश लोहार यांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सदर गुन्हा करणारा सराईत रेकॉर्डवरील आरोपी मौजे मांडवे ता .माळशिरस येथील शिवारात संशयितरित्या फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नातेपुते पोलीस ठाण्याचे श्री महारुद्र परजणे सहा पोलीस निरीक्षक यांना माहिती देऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अमलदार यांना तत्काळ रवाना करून मौजे मांडवे ता माळशिरस येथे सापळा लावून आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) बालाजी हनुमंत पवार रा खेड भोसे ता पंढरपूर जी सोलापूर असे असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुरंन ३०३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४),३०९(६),३५२, ३५१ (2) (3) प्रमाणे गुन्हा केल्याचे कबूल दिल्याने आरोपीनामे बालाजी हनुमंत पवार रा खेड भोसे ता पंढरपूर जि सोलापूर यास अटक करून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले ५०००/रू रोख रक्कम पैकी ३०००/ रुपये रोख रक्कम व जबरीने घेऊन गेलेली २५०००/ रू किंमती Honda कंपनीची Activa त्याचा आरटीओ नंबर MH 45 AJ 5103 असे एकूण २८००० रू मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे आरोपीनामे बालाजी हनुमंत पवार रा. खेड भोसे ता. पंढरपूर जि .सोलापूर याच्यावर यापूर्वी असलेले दाखल गुन्ह्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाणे, करकंब पोलीस ठाणे मोहोळ पोलीस ठाणे कुर्डूवाडी रेल्वे पोलीस ठाणे दौंड रेल्वे पोलीस ठाणे अकलूज पोलीस ठाणे येथे चोरी, जबरी चोरी व शरीराविषयक गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रा मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सोलापूर ग्रा.मा.उपविभागीय पोलिस अधिकारी, श्री नारायण शिरगावकर अकलूज उपविभाग अकलूज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक श्री महारुद्र परजणे, पोसई/ धनाजी ओमासे, पोहेकॉ/२११ राहुल रणवरे,पोहेकॉ/२१८० संदेश पवार,पोहेकॉ/८५० नवनाथ माने,पोना /५५९ अमोल वाघमोडे,पोना/५६२ राकेश लोहार,पोकॉ/११४५ नितीन पनासे,पोकॉ/२०५८ अस्लम शेख, होमगार्ड सुहास पवार व सायबर पोलीस ठाण्याचे पोकॉ/५ युसीफ पठाण यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या