माळखांबी ग्रामपंचायत समोर मविसेचे बेमुदत उपोषण

माळखांबी ग्रामपंचायत समोर मविसेचे बेमुदत उपोषण 

जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेले १ कोटी ४० लाखाचे काम सुरु करण्याची मागणी 

माळखांबी तालुका माळशिरस या गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जानेवारी २०२४ मध्ये मंजूर असलेल्या १ कोटी ४० लाख रुपयांच्या पाण्याची टाकी व पाईपलाईनचे सुरू न केलेले काम तात्काळ बक्षीस पत्र घेवून सुरु करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळखांबी ग्रामपंचायत समोर बोंबाबोंब आंदोलन व उपोषण सुरू करण्यात आले आहे.काम सुरू झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पदाधिकारी व उपोषण कर्ते यांनी सांगितले आहे.

यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे,शहराध्यक्ष सतीश साठे,उपाध्यक्ष महादेव साठे,ऋषिकेश साठे,श्रीमंत भगत,मारुती साठे,सोमनाथ साठे,लिमराज सकट,,सागर सरतापे,महेश साठे,राहुल सरतापे,विशाल साठे रावसाहेब साठे, सुनील साठे,रामचंद्र साठे ,नितीन सरतापे,विशाल सरतापे,सचिन सरतापे,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या