परिवर्तन महाशक्ती आघाडीत मविसे सामील होणार ?

सोलापूर जिल्ह्यात खळबळ ! 

परिवर्तन महाशक्ती आघाडीत मविसे सामील होणार ? 

माळशिरस विधानसभा निवडणूक किरण साठे लढविणार ? 


प्रतिनिधी : : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांची नुकतीच भेट झाली आहे.दोनच दिवसांपूर्वी स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी महाराज,प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू व स्वाभिमानी शेतकरी संघटचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक पक्षाचे पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत परिवर्तन महाशक्ती या नावाने तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे.याची घोषणा ही करण्यात आली आहे.राजू शेट्टी व किरण साठे यांच्या भेटी दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर,अजित कोडग,बाळासाहेब कांबळे,राजेश खरे,नागेश नाईकनवरे,तेजस भाकरे,नारायण बोराटे,राजेश खरात,रफिक मुलाणी,अमोल लोंढे उपस्थित होते.



नुकतीच परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा करण्यात आली आहे,आणि त्यानंतर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी तिसऱ्या आघाडीचे घटक असलेले राजू शेट्टी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.सोलापूर जिल्हा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे काम जोमाने सुरू असून त्यांनी तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यास तिसऱ्या आघाडीला चांगलीच बळकटी मिळण्याची शक्यता आहे.



माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी तयारी सुरू केली असून पक्ष बांधणीकडे लक्ष देवून पक्ष वाढीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.माळशिरस तालुक्यातील व माढा,आणि सांगोला तालुक्यातील अनेक गावांत त्यांच्या पक्षाच्या शाखा उघडण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यास माळशिरस विधानसभेची जागा महाराष्ट्र विकास सेना पक्षाला सुटल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी ठरणार आहे,छत्रपती संभाजी महाराज,बच्चू कडू,राजू शेट्टी यांना मानणारा मोठा वर्ग माळशिरस तालुक्यात असून त्यांची साथ किरण साठेंना मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे.छत्रपती संभाजी महाराज,आमदार बच्चू कडू,माजी खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर जावून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार का? तसेच आघाडीत सहभागी झाल्यास माळशिरस विधानसभा निवडणूक लढविणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.राजू शेट्टी यांची साठेंनी भेट घेतल्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या