माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धर्यशील भैय्या मोहिते पाटील व जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर यांनी लक्ष देण्याची गरज
मौजे तिरवंडी तालुका माळशिरस येथील यशवंतनगर ते तामशिवाडी रस्ता क्र 177 मधील तिरवंडी ते बंडगरमळा मेडद उंबरे दहिगाव रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक व दवाखान्यासाठी येजा करण्यासाठी ग्रामस्थांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याने व रस्ता खराब झालेला असल्याने ग्रामस्थांना येजा करण्यासाठी व वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे तरी सदर रस्त्याची दुरुस्ती दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत करावी अन्यथा दिनांक 1 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासुन रस्त्यावर तिरवंडी बंडगरमळा येथील धुळदेव मंदिरा शेजारी रस्त्यावरती तिरवंडी येथील ग्रामस्थयांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तिरवंडी ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांना दिले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील व जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर साहेब यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावं अशी तिरवंडी ग्रामस्थांची मागणी आहे. सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रती तहसीलदार माळशिरस व माळशिरस पोलीस स्टेशन यांना दिल्या आहेत.


0 टिप्पण्या