माजी मंत्री बाळासाहेब थोरात व किरण साठे यांची भेट

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व किरण साठे यांची भेट 

राजकीय वर्तुळात चर्चेला आले उधाण ! सदिच्छा भेट असल्याचा खुलासा 

प्रतिनिधी : : महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात,माजी राज्य गृहमंत्री सिद्धराम म्हेत्रे,ऑल इंडीया मुस्लिम विकास परिषदचे अध्यक्ष तथा सोलापूरचे काँग्रेस नेते एम.डी शेख यांची महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी भेट घेतली.माजी मंत्री थोरात हे अकलूजमधील सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आले होते.अकलूज येथील विश्रामगृह येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.यावेळी रूबाबभाई आतार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक महासचिव वजीर शेख,लालखान पठाण,साजिद सय्यद,जुबेर दुरूदकर,मविसेचे बाळासाहेब कांबळे,नागेश नाईकनवरे,मुक्तार बागवान,इम्रान बागवान,फरिद बागवान झाकीर नायकवाडी शिकंदर सय्यद,एम के भागोजी,मुस्ताख लालकोट , माजी नगरसेवक बागलकोटे , अशिफ शेख उपस्थित होते.बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.




काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांची भेट झाल्याने राजकीय वातावरण तापले असूनआहे.किरण साठेंनी महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविले आहेत,थोड्याच दिवसांत महाराष्ट्र विकास सेना पक्षाने राज्यातील अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे.गेल्याच आठवड्यात परिवर्तन महाशक्ती आघाडीचे घटक पक्ष असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि मविसे पक्षप्रमुख किरण साठे यांची भेट झाली होती.त्यात त्यांची काँग्रेस नेत्यांबरोबर भेट झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.किरण साठेंनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे ठरवले आहे का ?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.




काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अकलूजमधील नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते,त्यांनी आल्याचे समजल्यानंतर विश्रामगृह येथे जावून एमडी शेख यांच्या बरोबर त्यांचा सत्कार केला,त्यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही,
आम्ही अजून कोणत्याही आघाडी,महायुती,तिसरी आघाडी यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला नाही,त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे.राज्यात कुणाबरोबर जायच हे जेंव्हा ठरेल तो निर्णय त्यावेळी नक्की जाहीर करू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या