ज्ञानांकुर मध्ये नवरात्रोत्सवाचे सातवे वर्ष उत्साहात


ज्ञानांकुर मध्ये नवरात्रोत्सवाचे सातवे वर्ष उत्साहात 

शाकंभरी फाउंडेशन संचलित , ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल पेडगाव येथे नवरात्र उत्सव सोहळा शालेय व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापिका , सहकारी शिक्षक , पालक व विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत अतिशय आनंदात पार पडला .
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ .भारतीय ताई संदीप लगड (अध्यक्ष त्रिदल महिला आघाडी महाराष्ट्र राज्य )यांना देण्यात आले .सौ जयश्री अशोक काळे (अध्यक्ष , सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल आढळगाव) यांनी उपाध्यक्ष पद स्वीकारले . सौ अर्चना दत्तात्रय खराडे ( अध्यक्ष श्रीगोंदा तालुका त्रिदल महिला आघाडी ) तसेच उपस्थित नवदुर्गा यांचा सन्मान शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सहकारी वर्गातर्फे करण्यात आला तर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे माननीय श्री . लगड सर यांचा सन्मान संस्थापक अध्यक्ष माननीय श्री . नागनाथ पानसरे सर यांच्या हस्ते करण्यात आला .
सदर कार्यक्रमांमध्ये पाक कला , रांगोळी स्पर्धा ; गेम मदर डॉटर ऍक्ट गरबा इत्यादींचा समावेश होता . या कार्यक्रमाप्रसंगी सर्व महिला सखींच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे भाव झळकत होते .
पाककला स्पर्धेत उपवासाचे सर्व पदार्थ बनविण्यात आले सदर पदार्थ अतिशय रुचकर व लाजवाब होते यामध्ये ट्रँगल , सोलकढी , नारळाच्या दुधाची आमटी , गुजराती कटलेट , पौष्टिक खजूर खोबरे शेंगदाणा चिक्की , वेफर्स , वडा सॅम्पल गुलाब जामुन पिठले भाकरी इत्यादी पौष्टिक व सात्विक पदार्थ स्पर्धकांद्वारा बनविण्यात आले .
रांगोळी स्पर्धेतून मुक्तहस्तकला सादरीकरणासह संदेशही देण्यात आले , मुलगी वाचवा ,मोबाईल व्यसनमुक्ती ,अत्याचार थांबवा ' हिंसा थांबवा , मुलींना न्याय , इत्यादी समाजोपयोगी संदेश देण्यात आले .
सर्व महिला वर्गासाठी शाळा व्यवस्थापन , पेडगावचे सरपंच श्री ईरफान भैय्या पिरजादे तसेच माता-पालक सरपंच सौ. हेमाताई किरण शेळके (बोरी ) यांच्यामार्फत फराळ वाटप करण्यात आले .
सर्व कार्यक्रमातील महिला पारितोषिक विजेता सौ .मेघना गिरमकर , सौ .विद्या गिरमकर , सौ . सोनम शिंदे , सौ . माधुरी गिरमकर, सहभागी विद्यार्थी , सौ .गीतांजली पवार , सौ विद्या पानसरे , अश्विनी काळे ,  
पुनम करांडे , कुमारी अपूर्वा कवडे सन्माननीय माधुरीताई गुंड इत्यादी महिला पारितोषिके विजेता ठरल्या .
सदर कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण अध्यक्षा सौ .लगड मॅडम , सौ . काळे मॅडम , ज्येष्ठ माता गिरमकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .पल्लवी पानसरे व सहकारी वर्ग यांच्या हस्ते करण्यात आले .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनाली गिरमकर मॅडम व आभार प्रदर्शन सौ प्राजक्ता ढगे मॅडम यांनी केले .
  कार्यक्रमाच्या शेवटी माता पालकांचे गरबा सादरीकरण झाले पुढील वर्षी अधिकाधिक स्पर्धक समावेश घेतील या आश्वासन व ग्वाहीसह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या