इंद्रायणी नदी लवकरच प्रदूषणमुक्त होणार! संपूर्ण वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण - मोहनानंद महाराज पुरंदावडेकर

इंद्रायणी नदी लवकरच प्रदूषणमुक्त होणार! संपूर्ण वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण - मोहनानंद महाराज पुरंदावडेकर
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या आळंदीतून वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. गेली अनेक वर्षांपासून इंद्रायणी प्रदुषण मुक्तीसाठी विविध स्तरावर लढा सुरु आहे. १५ जानेवारी २०२४ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधी दरम्यान इंद्रायणी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्वांनी मोहनानंद महाराज पुरंदावडेकर, मुबारक शेख, राजू भाई इनामदार, दत्तात्रय साबळे... देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार शिरसावंद्य मानून सात दिवस फक्त पाणी पिऊन उपोषण केलं, जनजागृती केली...  

यावेळी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, इतर कर्मचारी, पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. आमची मागणी शासनापर्यंत, विभागीय आयुक्तापर्यंत पोहोचवली, शासकीय स्तरावर पाठपुरावा केला.. म्हणूनच आज इंद्रायणीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यास पीएमआरडीएने १,५३४ कोटीचा निधी देवून लोणावळ्यापासून १०५ किमी चे पात्र पवित्र होणार आहे. 

शासनाच्या या निर्णयामुळे वारकरी संप्रदायातील लहान थोर सर्वांना अत्यानंद झाला आहे. आमची इंद्रायणी माता प्रदूषणातून बाहेर येणार आहे.. विशेष उल्लेखणीय बाब म्हणजे या इंद्रायणी प्रदुषण मुक्ती लढ्यात केवळ आम्हीच सहभागी नाही तर आमच्या उपोषणापूर्वीपासून अनेक जणांचा लढा सुरु आहे. आम्हाला खारीचा वाटा उचलता आला आणि त्या प्रयत्नातून इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार याचा फार मनस्वी आनंद आहे.  

आम्ही केलेले उपोषण स्थगित करताना आळंदीचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी शासन दरबारी आपल्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची आणि माझ्या कार्यकाळात इंद्रायणी प्रदुषण मुक्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यांच्या पाठपुराव्याचा मोठा फायदा झाला. तसेच आळंदीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील,नारायण पडवळ, आबा रानवडे,रामदास कार॔डे, गोरक्षनाथ टावरे आजी-माजी नगरसेवक, वारकरी संप्रदाय, ग्रामस्थ...तसेच वृत्तपत्र, टीव्ही, वेब, अशा वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून या उपोषणाला जनतेपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आळंदी आणि परिसरातील पत्रकार बांधवांनी केले. सर्वांचे खुप खुप आभार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या