अकोले खुर्द तालुका माढा येथील श्री गणपती इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी येथील द्वितीय वर्ष डी. फार्मसीतील प्राजक्ता शिंदे, सानिया शेख, भोसले श्रावणी व दुपडे राजलक्ष्मी यांनी क्लीनिकल फार्मासिस्ट इन प्रोविजन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव या विषयावर पोस्टर बनवले होते. सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये महाविद्यालयातील प्राजक्ता शिंदे, सानिया शेख, भोसले श्रावणी व दुपडे राजलक्ष्मी पोस्टर प्रेसेंन्टेशन कॉम्पेटिशन मध्ये तिसरा क्रमांक मिळवल्याची माहिती प्राचार्या डॉ.रुपाली बेंदगुडे यांनी दिली व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी श्री गणपती फार्मसी संस्थेचे सचिव डॉ.आर.डी. बेंदगुडे ,अध्यक्ष अॅड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्रा. धनश्री करंडे, प्रा. कोमल यादव, प्रा. आशिष जाधव प्रा. रूपाली राऊत, प्रा.पूजा शिंदे, प्रा. स्वाती पाटील व प्रा. मोनिका माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

0 टिप्पण्या