माळशिरस तालुक्यातील लाडकी बहीण योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही बाळासाहेब सरगर

माळशिरस तालुक्यातील लाडकी बहीण योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही बाळासाहेब सरगर

अकलूज येथे विभागीय कार्यालय मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मीटिंग चे आयोजन मुख्यमंत्री लाडके बहिण योजना तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अधिकारी विजया पगारकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली यावेळी माळशिरस तालुक्यामधून आत्तापर्यंत नारीशक्ती ॲप 69294 व नवीन पोर्टलवरून 53760 असे एकूण 123054 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी नारीशक्ती ॲप 68638 व नवीन पोर्टल 52439 असे एकूण 121077 अर्जांना मंजुरी देऊन पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे तर नॉन आधार सीडी पैकी नारीशक्ती ॲप6631 व पोर्टल8278 असे एकूण14909 आधार शेडिंग नसल्याने पेंडिंग आहे याबाबत अंगणवाडी सेविका यांना गाव जाऊन लाभार्थीपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत गावांमध्ये ग्रामसेवक व तलाठी यांना गावामध्ये दवंडी देऊन लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा सुद्धा सूचना देण्यात आल्या असून याबाबत कॅम्प घेऊन आचारसंहितेपूर्वी एकही लाभार्थी याच्या पासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

 माळशिरस तालुक्यातून 43 लाभार्थींची पैसे बँकेत कट झाले आहे याबाबत बँकांची बैठक घेण्याबाबत येणार आहे शिवाय १३४४ अर्ज जन्मतारखेत बदल आधार कार्ड मध्ये व बँक खात्यामधील चुका यामुळे रिजेक्ट झाले त्याच्या सुद्धा याद्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडे देण्यात येणार आहेत माळशिरस तालुक्याच्या सर्वांनी केलेले प्रयत्न मुळे सोलापूर जिल्ह्यात तालुक्याचा लाभार्थ्यांमध्ये अग्रेसर आहे यामध्ये सोलापूर या ठिकाणी आठ तारखेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत होणाऱ्या महिला व मेळावा बाबत जास्तीत जास्त महिला कार्यक्रमासाठी घेऊन बाबत विचारविनिमय करण्यात आला त्यांची व्यवस्था पार्किंग व्यवस्था याबाबत प्रांत मॅडम यांनी सविस्तर सर्वांना सूचना करण्यात आले आहेत या मीटिंगसाठी सीडीपीओ आतार मॅडम नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, अकलूजच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य व मुख्यमंत्री लाडकी बहीण माळशिरस तालुका सदस्य सतीश सपकाळ,महाळुंग नगरपंचायतीचे प्रतिनिधी पंचायत समितीच्या वावरे मॅडम आदी उपस्थित होते यावेळी प्रांत मॅडम यांनी सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचला आले याबद्दल सर्वांचे विशेष कौतुक केलं तालुकाध्यक्ष यांनी तालुका भर दौरा करून योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकाधिकाऱ्यासमवेत तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणी संदर्भात असणाऱ्या सर्व अधिकाऱ्या बरोबर केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या