न्यायालयाचा कोलमडलेला थरकाप – महिला न्यायाधीश लाच घेताना अटक..

न्यायालयाचा कोलमडलेला थरकाप – महिला न्यायाधीश लाच घेताना अटक..

५० हजारांसाठी न्याय विकणारी ‘मॅडम’ न्यायव्यवस्थेची लाज...!



पुणे | न्यायाच्या खुर्चीला लागलेला सर्वात काळा डाग! ज्यांच्यावर देशाचा आणि जनतेचा विश्वास त्याच महिला न्यायाधीश अर्चना जठार ५० हजारांची लाच घेताना पकडल्या! न्यायाची तराजू विकत काढणारी ही ‘मॅडम’ जणू न्यायालय नव्हे, तर दलाली केंद्रच चालवत होती, असे धक्कादायक चित्र तपासात उघड झाले आहे.

◾लाचेचा सौदा गुपचूप… पण एसीबीच्या सापळ्यात धाडकन!

गुन्ह्यातील आरोपीला ‘दिलासा’ मिळवून देण्यासाठी ही न्यायाधीश स्पष्ट पैसे मागत होती, हे एसीबीने सिद्ध केले आहे. न्यायापेक्षा पैशांना प्राधान्य देणाऱ्या अशा भ्रष्ट ‘न्यायाधीशां’मुळे संपूर्ण न्यायिक व्यवस्थेवर घनगंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
फेक सीमकार्ड, मुंबई गँग आणि १८ कॉल्स  न्याय खरेदी-विक्रीचा उघड मळभ! तपासात समोर आलेली माहिती तर आणखी हादरवणारी आहे:
▪️जठार यांनी आरोपीशी थेट १८ कॉल्स
▪️ इतकंच नव्हे संपर्कासाठी मुंबईतील संशयितांच्या नावावरची फेक सीमकार्डे वापरली
▪️ जठार व सुशमा गायकर यांच्यात १४ वेळा गुप्त संभाषण
हे कशाचे संकेत आहेत? न्यायालयाच्या चार भिंतीतून ‘सेटिंग’चे साम्राज्यच चालत होते का? तपास याच दिशेने घुसत आहे.

◾५० हजारांसाठी न्यायाचा सौदा – किती खाली गिरेन न्यायालय? जनतेचा सवाल अगदी सरळ आहे.

न्याय देणारेच जर दलाली करत असतील तर आरोपीला वाचवणारे न्यायाधीश आणि न्यायासाठी लढणारे सामान्य नागरिक या दोघांत फरक काय ? अशा न्यायाधीशांना पदावर बसू देणारे वरिष्ठ अधिकारीही आता चौकशीतून सुटणार नाहीत, अशी मागणी उठू लागली आहे.

◾न्यायालयात दलालीचे रॅकेट ?  एसीबी तपासाचे जाळे आणखी मोठे होणार! हा एकच प्रकरण नाही.

फेक सीमकार्ड, बाहेरील संपर्क, आरोपीशी व्यवहार…
सगळ्या गोष्टी एका मोठ्या न्याय दलालांच्या रॅकेटकडे बोट दाखवत आहेत.एसीबी आता केवळ जठारपुरती चौकशी न करता संभाव्य संगनमतातील सर्व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
न्यायालयाच्या मानाला काळा फास – ‘मॅडम ५० हजार’ प्रकरणातून उघड झालेले भीषण वास्तव
ही घटना भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वात भयानक वास्तवापैकी एक आहे. न्याय विकत घेतला जातो. न्यायालयात दलाली चालते. आणि खुर्चीवर बसलेली ‘न्यायाधीश’च व्यवहाराच्या खेळात!
यापेक्षा लज्जास्पद, घृणास्पद आणि संतापजनक काय असू शकते?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या