ACB कडे सादर होणार पुरावे? उपाधीक्षक सुजित पाटील यांच्यावर हप्तेवसुलीचे आरोप, कारवाई होणार की संरक्षण?
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथील कथित मासिक हप्तेवसुली प्रकरण अधिकच गंभीर बनले असून या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कडे लवकरच ठोस पुरावे सादर केले जाणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. या प्रकरणात उपाधीक्षक सुजित पाटील यांनी अँटी करप्शनच्या नावाचा आधार घेऊन परवानाधारकांकडून हप्तेवसुली करून गोळा झालेल्या रक्कमेतून दर महिना 15,000/- हजार रुपये प्रत्येक निरीक्षक विभागाकडून केल्याचा गंभीर पुरावेनिशी आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात गोळा करण्यात आलेले आर्थिक व्यवहाराचे व संवादाचे ठोस पुरावे ACB अधिकाऱ्यांसमोर सादर करण्याची तयारी पूर्ण झाली असून, या पुराव्यांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कायदेशीर कारवाई करणार की संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, विभागातील काही अधिकाऱ्यांकडून असा समज निर्माण करण्यात येत होता की गोळा होणारे मासिक हप्ते हे “अँटी करप्शन संदर्भातील व्यवस्था” म्हणून दिले जात आहेत. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे हप्ते पोहोचवले जात असल्याचीही चर्चा विभागात सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या प्रकरणात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा ACB मधील कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याची कसूर आढळून आली, तर संबंधित सर्व पुरावे थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ACB चे महासंचालक (DGP स्तर) यांच्यासमोर सादर केले जाणार आहेत.तक्रारदाराने इशारा देत सांगितले की, या प्रकरणात योग्य कारवाई झाली नाही तर संपूर्ण प्रकरणातील पुरावे सार्वजनिक करून सोशल मीडियावर मांडले जाणार असून, यामुळे शासनाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो.
दरम्यान, या तक्रारीमुळे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथे मोठी खळबळ उडाली असून लवकरच या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे धक्कादायक पुरावे असून ते अधिकृतरित्या सादर झाल्यानंतर अनेक अधिकारी अडचणीत येऊ शकता

0 टिप्पण्या