पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध ढाबे व ‘हप्ते राज’चे जाळे? उत्पादन शुल्क एफ विभागातील महिला अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप ?
पिंपरी-चिंचवड, पुणे (प्रतिनिधी)
शहरातील चऱ्होली, डुडुळगाव, वडमुखवाडी, भोसरी आणि दिघी परिसरात अवैध ढाबे व दारू विक्रीचा मोठा सुळसुळाट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागातील महिला अधिकाऱ्यांवरच संरक्षण देत असल्याचे धक्कादायक आरोप तक्रारदाराने केले आहेत.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित भागात किमान 20 ढाबे अवैधरित्या सुरू असून त्यांच्याकडून दरमहा ₹5,000 ते ₹10,000 पर्यंत कथित हप्तेवसुली केली जाते. या यादीत खालील ढाब्यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हॉटेल स्मोकी ढाबा – चऱ्होली हॉटेल आराध्या – चऱ्होली
हॉटेल लयभारी – चऱ्होली हॉटेल रामकृष्ण – चऱ्होली
जाळीचा मळा – वडमुखवाडी हॉटेल स्वरूप – चऱ्होली
हॉटेल श्री नंदन ढाबा – डुडुळगाव हॉटेल मयूर – डुडुळगाव
हॉटेल प्रविण – डुडुळगाव हॉटेल श्री ढाबा – डुडुळगाव
हॉटेल धारका – वडमुखवाडी हॉटेल जगदंबा – भोसरी
हॉटेल सह्याद्री – दिघी हॉटेल सरसंग – दिघी
हॉटेल बाराम – चऱ्होली हॉटेल रॉयल सम्राट – पुणे-नाशिक रोड, भोसरी
हॉटेल मेफील – चऱ्होली हॉटेल राजदूत – पुणे-नाशिक रोड, भोसरी
हॉटेल फ्रेंड्स चायनीज सेंटर – डुडुळगाव हॉटेल तपस्या – चऱ्होली.
दरम्यान, तक्रारदाराने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. देशी दारू विक्री करणाऱ्या परवानाधारकांकडून एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री होत असून, हे उल्लंघन संबंधित महिला दुय्यम निरीक्षक यांच्या कथित संरक्षणामुळेच सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. महिला दुय्यम निरीक्षक माधवी गडदरे यांना मागील तीन महिन्यांपासून एमआरपी उल्लंघनाबाबत वारंवार माहिती देण्यात आली असूनही त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोपही तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे त्या आपल्या कर्तव्याच्या पालनात निष्क्रिय असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच, या सर्व प्रकारांना वरिष्ठ पातळीवरूनही उपअधीक्षक सुजित पाटील यांच्याकडून कथित संरक्षण मिळत असल्याने अवैध व्यवसायांना बळ मिळत असल्याची विभागात चर्चा सुरू आहे.
या प्रकरणामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचा दावा होत असून, ग्राहकांचीही आर्थिक लूट होत असल्याचा आहे. परंतु महिला अधिकारी यांना यासंबंधी कोणतीही कारवाई करण्यात रस नाही.
लवकरच या प्रकरणातील कर्मचारी जवान यांच्याकडून केले जाणारे हफ्ता वसुलीचे ठोस पुरावे त्याचबरोबर नूतनीकरणाच्या नावावर परवानाधारकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली जाणार असल्याचे ठोस पुरावे जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे सादर करून , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) तसेच इतर संबंधित यंत्रणांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय असेल आणि प्रशासन यावर कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या