अवैध होलसेल मद्य रॅकेटला अधिकाऱ्यांचा पाठिंबा? निरीक्षक पांडुरंग पाटील व दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्यावर गंभीर आरोप..?

अवैध होलसेल मद्य रॅकेटला अधिकाऱ्यांचा पाठिंबा? निरीक्षक पांडुरंग पाटील व दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्यावर गंभीर आरोप....?




प्रतिनिधी - पुणे 
जिल्ह्यात अवैध होलसेल मद्य विक्रीचा मोठा रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या गैरप्रकाराला राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक पांडुरंग पाटील व दुय्यम निरीक्षक रोहित माने यांचा थेट आर्थिक पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठराविक वाईन शॉपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होलसेल मद्य विक्री सुरू असून, नियमबाह्य पद्धतीने मद्य साठा बाहेर पाठवला जात आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली होती. मात्र, कारवाई करण्याऐवजी निरीक्षक पांडुरंग पाटील आणि दुय्यम निरीक्षक रोहित माने यांनी संबंधित व्यावसायिकांना संरक्षण दिल्याचा आरोप समोर आला आहे.दरम्यान, दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्याबाबत तर अधिक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. जिल्ह्यातून अवैध व्यवसायांकडून आर्थिक हप्ते गोळा करणे हेच आपले “पदसिद्ध काम” असल्याच्या भूमिकेत ते कार्य करत असल्याची चर्चा उत्पादन शुल्क वर्तुळात सुरू आहे.

तक्रारीनुसार, ठराविक ट्रेडवरून वेगवेगळ्या वाहनांद्वारे जादा प्रमाणात मद्य वाहतूक करण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त वाहतूक पास तयार करण्यात येत असून, त्यामुळे शासनाच्या महसुलाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे. या बदल्यात संबंधित अधिकाऱ्यांकडून मोठ्या रकमेचा हप्ता घेतला जात असल्याची खात्रीशीर माहिती तक्रारदाराने दिली आहे.
विशेष म्हणजे, चोरीच्या मार्गाने मद्य बाहेर जात असल्याची स्पष्ट माहिती देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट, दुय्यम निरीक्षक रोहित माने यांनी “अधिक वाहतूक पास बनवले गेले नाहीत” असे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराने या प्रकरणाचे ठोस पुरावे जमा केले असून, वाहतूक पास बनवण्याचे दस्तऐवजीकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते.या प्रकरणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस येण्याची शक्यता असून, संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या