पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कथित कटकारस्थान लवकरच जनतेसमोर ?
पुणे, प्रतिनिधी : पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांनी आपल्या वैधानिक अधिकारांचा गैरवापर करून परवानाधारकांना लाभ मिळावा यासाठी गंभीर स्वरूपाचे कटकारस्थान रचल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणातील अनेक बाबींचा लवकरच खुलासा करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या आरोपानुसार, दौंड विभागातील काही अधिकाऱ्यांनी स्वतःवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि कथित कर्तव्यातील निष्काळजीपणा झाकण्यासाठी परवानाधारकांच्या माध्यमातून खोट्या आशयाची प्रतिज्ञापत्रे तयार करून त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित प्रतिज्ञापत्रांतील कथित विसंगती समोर आल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, खोटी प्रतिज्ञापत्रे देणाऱ्या काही परवानाधारकांच्या कथित अनियमितता लपविण्यासाठी शासनाच्या महसुलाचे नुकसान झाल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. या सर्व बाबींशी संबंधित पुरावे योग्य वेळी सार्वजनिक करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील सर्व कथित खोट्या प्रतिज्ञापत्रांची निष्पक्ष चौकशी करून दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे तक्रारदारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

0 टिप्पण्या