जिम,ब्युटी पार्लर आणि सलून संदर्भातील निर्बंधात बदल...!आदेश जारी.....



कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिम,ब्युटी पार्लर आणि सलून यांच्या निर्बंधात बदल करण्यात आले आहेत.१०जानेवारीपासून हे आदेश लागू होणार आहेत.ब्युटी पार्लर आणि हेअर कटींग सलून ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवता येतील तसेच जिमसुद्धा ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. या आधी दोन्ही बंद ठेवण्याचे आदेश आले होते.या साठी ५० टक्के क्षमतेसह उघडी राहण्याची परवानगी दिली जाईल.सलून मध्ये मास्क काढता येणार नाही.अशाच सेवा सुरू राहतील.फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांचे केवळ पूर्ण लसीकरण झालेले आहे. अशाव्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील. 
फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या