बारामतीमध्ये छापील किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये विक्री करून तळीरामांची होते लूट.........?



बारामती हद्दीमधील परवानाधारक देशी दारू विक्री करणारे विक्रेते हे  ग्राहकाकडून छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम आकारून विक्री करत आहेत. याच्यावर कोणाचे नियंत्रण नाही का ? हे जर असे चालू राहिले तर ग्राहकांची होणारी फसवणूक व पिळवणूक कोण थांबवणार ? असा प्रश्न ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यावर कोणी तरी नियंत्रण केले पाहिजे.योग्य किमतीत विक्री व्हावी,अशी ग्राहकांची इच्छा आहे. तरी सदर उत्पादन शुल्क खात्याने याची दखल घेऊन कायदेशीर ती कारवाई करण्यात यावी ही मागणी ग्राहकांद्वारे करण्यात येतआहे.
   मागील काही प्रकरणांमध्ये उत्पादन शुल्क खात्याने कारवाई करूनही परवानाधारकांना भीती का नाही. त्यामुळे शासनाने कायदा व सुव्यवस्था राहण्याकरिता अशा परवानाधारकांचे लायसन्स सस्पेंड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करावी.
   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या