प्रतिनिधी :- आष्टी
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील मौजे खडकत या ठिकाणी सैनिक आपल्या दारी अभियान अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून गाव तेथे शाखा काढून सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवारावरील अन्याय व अत्याचार दुर करण्यासाठी मौज खडकत या ठिकाणी त्रिदल सैनिक सेवा संघाची शाखा काढण्यात आली.त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप लगड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.अशोक चौधरी,त्रिदल सैनिक सेवा संघाचे प्रवक्ता मा एस.के.आठरे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे आष्टी तालुकाध्यक्ष मा.अंकुश खोटे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे आष्टी तालुका सचिव मा.खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे भव्य व दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला.त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील वाढता अन्याय व अत्याचार दुर करण्यासाठी व सैनिक व सैनिक परिवार एकत्र करण्यासाठी गाव तेथे शाखा काढण्याचे काम सैनिक आपल्या दारी अभियान अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून जोरदार चालु आहे.
महाराष्ट्र राज्यातील गाव तेथे शाखा काढण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना दिली आहे.महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यात व छत्तीस जिल्ह्याच्या तालुक्यात त्रिदल सैनिक सेवा संघ कार्यरत आहे.कोणत्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष पुर्ण गावोगावी सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र आणण्याचे काम करतील त्या तालुकाध्यक्ष यांना त्रिदल गौरव पुरस्कार दिला जाणार आहे.या पुरस्कारा बरोबर एक लाख अकरा हजार एकशे अकरा रूपये बक्षीस देण्याचे त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड व त्रिदल सैनिक सेवा संघाचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.अशोक चौधरी यांनी जाहिर केले आहे.हे बक्षीस कोणत्या तालुक्यात जाणार याचे महाराष्ट्र राज्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाचे लक्ष लागले आहे.
त्रिदल सैनिक सेवा संघ ही संघटना फक्त नि फक्त जवानांची एकमेव संघटना आहे.या संघटनेमध्ये अधिकारी वर्गाला व राजकीय दोन टक्के माजी सैनिकांना सभासदत्व दिले जात नाही.व त्रिदल सैनिक सेवा संघाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.त्रिदल सैनिक सेवा संघ ही संघटना सामाजिक संघटना असून ही संघटना फक्त नि फक्त सैनिक व सैनिक परिवाराची संघटना आहे.
0 टिप्पण्या