गुगलवरून ‘एसबीआय’ कंपनीचा नंबरवर फोन द्वारे संपर्क करणाऱ्या एका महिलेची फसवणूक करून ५४ हजारापेक्षा जास्त पैशांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला ठाणेनगर पोलिसांनी झारखंड येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या खात्यात पोलिसांना ३० लाख रुपये असल्याचे निदर्शनात आले. या प्रकरणात आणखी २ आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
ठाणे नगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने देखील असाच प्रकारे फसवणूक केली आहे. एका महिलेने ‘एसबीआय’ बँकेचा नंबर ऑनलाईन वेबसाईटवरून मिळवला आणि त्या नंबरवर फोन केला असता समोरील आरोपीने त्यांची दिशाभूल करत त्यांना ‘एनी डेस्क’ अॅपच्या सहाय्याने त्यांच्या मोबाईलचा ओटीपी नंबर मिळवत महिलेच्या क्रेडीट कार्ड वरून ४९ हजार ३९३ आणि डेबिट कार्ड वरून ५ हजार रुपये असे एकूण ५४ हजार ६९३ रुपये काढून घेतले.
या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने ठाणे नगर पोलिसांकडे ऑनलाईन पद्धतीने आपली ५४ हजार ५९३ रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार १७ जानेवारी रोजी केली होती. या घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करत तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने तपास सुरु केला. या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना फसवणूक करणारा आरोपी हा झारखंड येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी झारखंड येथे पोहचून सदर फसवणूक करणाऱ्या आरोपीला जामताडा, झारखंड येथील फोफनाद गावातून अटक केली आहे. या अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी ७ विविध कंपन्यांचे मोबाईल फोने १६ गुन्ह्यांमध्ये वापरलेले सीम कार्ड जप्त केले आहेत. या प्रकरणात आणखी २ जन सहभागी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा प्रकाराच्या सायबर गुन्ह्यांमध्ये झारखंड ही प्रसिद्ध शहर आहेत. या प्रकरणातील आरोपीचे अकाऊंट पोलिसांनी फ्रीज केल असून त्या अकाऊंटमध्ये ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले आहे. हे ३० लाख रुपये त्या आरोपींनी नागरिकांची फसवणूक करून जमवले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करत त्या दिशेन तपास सुरु केला आहे.
फसवणूक झालेल्या महिलेने विलंब न करता सतर्कता दाखवत त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर उघड केला. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने तीन दिवसांमध्ये महिलेचे ४८ हजार परत मिळवले. मात्र अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी कंपनी किंवा बँकांच्या अधिकृत वेबसाईट वरून माहिती किंवा मोबाईल नंबर मिळवावा आणि अधिकृत नंबर वर संपर्क करावा तसेच कोणालाही आपला ओटीपी क्रमांक देऊ नये असे आवाहन ठाणे पोलीस सहाय्यक आयुक्त सोनाली ढोले यांनी केल आहे.
0 टिप्पण्या