प्रतिनिधी :- शिरूर
शिरूर तालुक्यातील मौजे चिंचोली मोराची या ठिकाणी दोन सेवानिवृत्त सैनिकांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा भव्य व दिव्य पार पडणार आहे.सत्कारमृती मा.सोमनाथ थोपटे साहेब,मा.दत्तात्रय मिडगुले साहेब यांचा सेवापुर्ती कार्यक्रम मौजे चिंचोली मोराची या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.विक्रम जगताप साहेबांचे सैनिकांच्या चारित्र्य विषय प्रवचन करणार आहेत.तरी शिरूर तालुक्यातील शहिद वीर पत्नी,शहिद वीर माता-पिता,अपंग सैनिक,सेवारत सैनिक,माजी सैनिक,सैनिक व सैनिक परिवाराचा सत्कार करण्यात येणार आहे.तरी शिरूर तालुक्यातील सैनिक व सैनिक परिवराने वेळातवेळ काढून उपस्थित राहून आपणच आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे जाहिर आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा.शामराव धुमाळ साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे पुणे जिल्हा सचिव मा.बाळासाहेब नवले साहेब, त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष मा.बबन पवार साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष मा.नामदव घावटे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष मा.विठ्ठल जाधव साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर तालुका सचिव मा.भाऊसाहेब जाधव साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे शिरूर तालुका जेष्ठ मार्गदर्शक मा.महादेव घावटे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मा.बो-हाडे साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघा शिरूर टीमने केले आहे.सैनिक व सैनिक परिवाराच्या कार्यक्रमांमध्ये सैनिकांनी सहपरिवासह उपस्थितीत राहिलेच पाहिजे याच कार्यक्रमात सैनिक व सैनिक परिवाराची ओळख होते.शिरूर तालुक्याच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराचे लक्ष लागले आहे.आतापर्यंत शिरूर तालुक्यात जे सैनिक व सैनिक परिवाराचे कार्यक्रम झाले आहेत ते सर्व कार्यक्रम मोठे झाले आहेत.उद्याच्या कार्यक्रमाचा आदर्श महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार घेणार असल्याची माहिती त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड हे पत्रकारांशी बोलत होते.
या कार्यक्रमाला शोभा वाढविण्यासाठी त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या शिरूर तालुकाध्यक्षा सौभाग्यवती ईचकेताई व त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या शिरूर तालुका कार्याध्यक्षा सौभाग्यवती बो-हाडेताई यांनी सर्व सैनिक व सैनिक परिवाराच्या महिला वर्गाला आमंत्रण दिले असल्या कारणाने या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिला येणार आहेत अशी माहिती मा.सौभाग्यवती ईचकेताई व मा.सौभाग्यवती बो-हाडेताई यांनी दिली आहे.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन त्रिदल सैनिक सेवा संघाचे चिंचोली मोराची अध्यक्ष मा.नाणेकर साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघ मोराची चिंचोली येथील टीम करत आहे.तरी शिरूर तालुक्यातील सर्व सैनिक व सैनिक परिवाराने कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
0 टिप्पण्या