सोलापूर जिल्ह्यात अमृत जवान अभियान सन २०२२ मध्ये किती आजी-माजी सैनिकांची कामे झाली याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी चर्चा.संदीप लगड...........!


प्रतिनिधी  :- सोलापूर 
महाराष्ट्र राज्यातील अमृत जवान अभियान २०२२ या अभियानाची सुरूवात ०१ में ते १५ जुन पर्यंत शासन निर्णयानुसार झाली होती.या अमृत जवान अभियानामध्ये सोलापूर जिल्हातील अकरा तालुक्यात आजी-माजी सैनिकांनी आपल्या आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केले होते.काही तालुक्यातील तहसिलदार साहेबांनी आलेले अर्ज संबधीत विभागाकडे पाठवले होते.त्या संबधीत विभागाने काय कारवाई केली सोलापूर जिल्हयातील अकरा तालुक्यातील अहवालाची मागणी सोलापूर जिल्ह्याचे अपर जिल्हादंडाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी मा.शमा पवार मॅडम यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. मा.शमा पवार मॅडम सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडून अमृत जवान अभियान अंतर्गत २०२२ या अभियानामध्ये किती आजी-माजी सैनिकांचे अर्ज आले व किती संबंधीत विभागाने कामे केली व किती आजी-माजी सैनिकांची कामे झाली व किती आजी-माजी सैनिकांची कामे झाली नाहीत.कामे झाली नाही तर का नाही झाली या विषयावर सोलापूर जिल्ह्याचे अपर जिल्हादंडाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी मा.शमा पवार मॅडम यांच्याशी त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र आढाव साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे सोलापूर जिल्हा सचिव मा.ज्ञानेश्वर जोरे साहेब व सोलापूर जिल्ह्यातील टीमच्या बैठक संपन्न झाली या बैठकीत सैनिकांच्या अनेक विभागाच्या अडीअडचणी बाबत चर्चा सकारात्मक झाली.

मा.शमा पवार मॅडम यांनी सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यात जे सैनिकांची कामे झाली नसतील ती कामे करून देण्याचे अश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्याशी त्रिदल सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी मिटिंग घेवून सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या पध्दतीने शासन व प्रशासनाच्या मदतीने कामे केली जातील.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार होणारा अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून मोठा कदम उचलण्यात येणार आहे.सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून गाव तेथे शाखा काढण्यात येणार आहे.आता महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र येवून व आपल्या गावातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करून आपल्या गावामध्ये त्रिदल सैनिक सेवा संघाची शाखा काढली तर सैनिक व सैनिक परिवारावर होणारा अन्याय व अत्याचार होणारच नाही अशी प्रतिक्रिया त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड  साहेब यांनी दिली आहे.सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यात अमृत जवान सन्मान अभियान अंतर्गत जे अर्ज दिले आहेत त्या आजी-माजी सैनिकांची १००% कामे करून घेतली जातील.अशी प्रतिक्रिया त्रिदल सैनिक सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र आढाव साहेब व त्रिदल सैनिक सेवा संघाचे सोलापूर जिल्हा सचिव मा.ज्ञानेश्वर जोरे साहेब यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सैनिक व सैनिक अडीअडचणी दूर करण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाची मिटिंग घेण्यात आली ही मिटींग त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.विक्रम जगताप साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अंकुश खोटे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी मा.राजेंद्र कापरे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.काशिनाथ पंडित साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.आबासाहेब गरूड साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.नवनाथ मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग घेण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून जोरदार सुरूवात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या